शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: आम्हाला राजकारण करायचे नाही, फक्त आरक्षण पाहिजे, मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका- मनोज जरांगे
2
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता वाढताच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल पहिला निर्णय
3
जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
4
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
5
रितेश देशमुखचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाला- "मनोज जरांगेजी हे..."
6
"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
7
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
8
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...
9
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
10
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
11
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
12
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
13
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
14
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
15
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
16
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
17
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
18
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
19
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
20
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!

कोरोनामुळे विरजन : मैत्री दिनाचा उत्साह मावळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 19:19 IST

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे तरूणाईचा मोठा हिरमोड झाला. कोरोनामुळे प्रत्यक्ष भेट घेत मैत्री दिन साजरा करता आला नाही, त्यामुळे तरूणाईने आपल्या मित्रांसोबतची जुनी छायाचित्रे फेसबुकवर शेअर करत आठवणींना उजाळा दिला

ठळक मुद्देमैत्रीचा आनंद भेटीगाठीतून व्यक्त करता आला नाही कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे तरूणाईचा मोठा हिरमोड

नाशिक : दरवर्षीप्रमाणे ‘मैत्री दिन’ यंदा शहरात साजरा होताना अनुभवयास आले नाही. कोरोनाच्या सावट असल्यामुळे तरूणाईच्या आनंदावर विरजन पडले. तरूणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना सोशलमिडियावर सचित्र उजाळा देणे पसंत केले. कॅफे, रेस्टॉरंट, उद्याने, पर्यटनस्थळे सर्वच ठिकाणी सामसुम असल्याचे चित्र होते.महाविद्यालयीन जीवनात कट्ट्यांवरून बहरलेली मैत्री अधिकाधिक दृढ होत जाते. मैत्रीचे बंध कायमस्वरूपी टिकून रहावे, यासाठी दरवर्षी आॅगस्टच्या पहिल्या रविवारी आपल्या मित्रपरिवारासोबत तरूणाई एकत्र येत जल्लोष करत असते; मात्र यावर्षी तरुणाईचा मैत्रीदिनाचा उत्साह कोरोनामुळे पुर्णपणे मावळल्याचे दिसून आले. मागील वर्षी जोरदार पावसामुळे मैत्री दिन साजरा करणे युवा वर्गाला शक्य झाले नव्हते, यंदा कोरोनामुळे मैत्रीचा आनंद भेटीगाठीतून व्यक्त करता आला नाही, असा सूर गोदापार्क परिसरात एकत्र आलेल्या काही तरूणांच्या ग्रूपमधून उमटला.एरवी मैत्री दिनाला कॉलेजरोड, गंगापूररोड, सोमेश्वर मंदीर परिसर, दुधस्थळी धबधबा, फाळकेस्मारक, पांडवलेणी, नेहरू वनोद्यान, अंजनेरी, गंगापूर धरण परिसर गजबजलेला पहावयास मिळतो. या ठिकाणी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन तरूण-तरूणींचे ग्रूप एकत्र येत ‘सेलिब्रेशन’ करतात; मात्र रविवारी (दि.२) तरूणाईच्या पसंतीचे वरील सर्व ठिकाणी निरव शांतता अनुभवयास आली. बोटांवर मोजण्याइतके ग्रूपचा अपवाद वगळता मैत्रीदिन साजरा करताना कोणीही दिसून आले नाही. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे तरूणाईचा मोठा हिरमोड झाला. कोरोनामुळे प्रत्यक्ष भेट घेत मैत्री दिन साजरा करता आला नाही, त्यामुळे तरूणाईने आपल्या मित्रांसोबतची जुनी छायाचित्रे फेसबुकवर शेअर करत आठवणींना उजाळा दिला तर काहींनी व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटसवर छायाचित्र, व्हिडिओ सेट करून मैत्री दिन साजरा केला. तसेच पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात आर्द्रता निर्माण झाल्याने दमटपणा वाढल्यामुळे अल्हाददायक वातावरण रविवारी अनुभवता आलेले नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFriendship Dayफ्रेंडशिप डे