शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

ब्रह्मगिरी प्रदक्षिणेवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:10 IST

त्र्यंबकेश्वर : पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ब्रह्गिरी प्रदक्षिणेवर कोरोनाचे सावट आहे. येत्या मंगळवारपासून (दि.२१) श्रावणमास सुरू होत आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी होणारा परिक्र मेच्या वाटेवर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा होत असते. ही प्रदक्षिणा साक्षात महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाला केली जाते. आबालवृद्ध उत्साहाने प्रदक्षिणा करतात.

त्र्यंबकेश्वर : पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ब्रह्गिरी प्रदक्षिणेवर कोरोनाचे सावट आहे. येत्या मंगळवारपासून (दि.२१) श्रावणमास सुरू होत आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी होणारा परिक्र मेच्या वाटेवर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा होत असते. ही प्रदक्षिणा साक्षात महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाला केली जाते. आबालवृद्ध उत्साहाने प्रदक्षिणा करतात.तिसºया श्रावण सोमवारी तर जणू सिंहस्थातील शाही पर्वणी भरत असते. जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाला तिसरा श्रावणी सोमवार नियोजनासाठी दोन ते तीन बैठकाही घ्याव्या लागतात. यावरून संपूर्ण श्रावण महिना व तिसºया सोमवारी त्र्यंबकेश्वरलाकिती गर्दी होत असते याची कल्पना येते. तथापि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मुळात श्रावण महिन्यात नेहमीप्रमाणे जल्लोष होईल, असे चित्र आज तरी दिसत नाही. हिंदु धर्मात श्रावण महिना व्रतवैकल्याचा उपासतापासांचा असतो आणिविशेष म्हणजे भगवान शंकराचा उपासनेचा महिना असतो. त्र्यंबकेश्वरला येणारे दरवर्षी कोट्यवधी शिवभक्त येत असतात.-------------------व्यावसायिकांची उपासमारपावसाळ्यात त्र्यंबकेश्वर परिसरातील सृष्टी सौंदर्य बहरते. डोंगरावरून वाहणारे धबधबे, नदीनाले भरभरून वाहतात. निसर्गरम्य वातावरण, रिमझिम पाऊस, सर्वत्र हिरवाई पसरलेली झाडे-वृक्षवेली, रानफुले आदींनी निसर्गराजाला बहर आला असतो. अंजनेरी, पहिने, दुगारवाडी धबधबा त्र्यंबकेश्वरसह अंबोली घाट, अंबोली परिसरातील धुके यांचा हा विलोभनीय नजारा डोळ्यांचे पारणे फेडतो. श्रावण महिन्यात येणारे भाविक तर येतातच; पण असंख्य निसर्गप्रेमी येत असतात. गडकिल्ले, पहाडावरचे ट्रेकिंग करण्यासाठी काही हौशी ट्रेकर्स येत असतात. त्र्यंबकेश्वरला गेल्या पंधरा दिवसांपासुन ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी २१ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ११ रु ग्ण पॉझििटव्ह असुन विविध रु ग्णालयात उपचार घेत आहेत. अशा या पाशर््वभूमीवर गावात मंदीर बंद आहे. स्नानासाठी कुशावर्त बंद आहे. बस प्रवासी टॅक्सी बंद आहेत. मुख्य मंदीर बंदमुळे शहराची अर्थ व्यवस्था ढासळली आहे.अनेक व्यावसायिक मजुर आदींची उपासमार होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक