शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेच्या अंदाजपत्रकावर कोरोनाचे सावट

By संजय पाठक | Updated: March 25, 2021 15:13 IST

नाशिक-  महापालिकेचे गेल्या वर्षाचे अंदाजपत्रक काेरोनामुळे नगरसेवकांच्या फार कामाला आले नाही. त्यामुळे आता यंदाच्या पंचवार्षिक कारकिर्दीतील अखेरच्या वर्षी तरी कामे हेाण्याची अपेक्षा असताना पुन्हा एकदा कोरेानाचे संकट वाढल्याने नगरसेवकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे अखेरच्या वर्षी तरी कामे हेाणार की झिरो बजेट होणार अशी शंका उपस्थित केली जात आहे.

ठळक मुद्देपुन्हा वाढला संसर्गनगरसेवक चिंतेत निवडणूका तोंडावर पण कामे रखडली

नाशिक-  महापालिकेचे गेल्या वर्षाचे अंदाजपत्रक काेरोनामुळे नगरसेवकांच्या फार कामाला आले नाही. त्यामुळे आता यंदाच्या पंचवार्षिक कारकिर्दीतील अखेरच्या वर्षी तरी कामे हेाण्याची अपेक्षा असताना पुन्हा एकदा कोरेानाचे संकट वाढल्याने नगरसेवकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे अखेरच्या वर्षी तरी कामे हेाणार की झिरो बजेट होणार अशी शंका उपस्थित केली जात आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात केारोनाचे संकट आले आणि मार्च अखेर हेाणारी कामे रखडली. त्यानंतर अखेरच्या पंधरा दिवसात वसुल हेाणारी घरपट्टी पाणी पट्टी देखील खोळंबली. त्यामुळष एप्रिल महिन्यात नव्याने अंदाजपत्रक सादर करताना खरे तर खूप काही नवीन योजना अपेक्षीत नव्हत्या. तरीही प्रशासनाने त्यातून मार्ग काढला आणि बऱ्यापैकी कामे करण्याचा प्रयत्न केला. खरे तर गेल्या वर्षी अनेक नगरसेवकांनीच आपला नगरसेवक निधी केारोनासंदर्भातील कामांसाठी वापरण्याचे पत्रही दिले हेाते. कारण संकट खूपच गहीरे होते. त्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात सुधारीत अंदाजपत्रकात ७३९ कोटी ८७ रूपये खर्च झाला नसल्याचे आढळले. नवे अंदाजपत्रक तयार करताना २५३ कोटी ८६ लाख रूपयांच्या आरंभीक शिलकेसह २३५९ केाटी रूपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

महापालिकेच्या सध्याच्या पंचवार्षिक कारकिर्दीचे हे अखेरचे वर्ष असल्याने आयुक्तांनी नगरसेवकांसाठी १३ केाटी ३४ लाख रूपयांचा नगरसेवक निधी आणि ३८.१० कोटी रूपयांचा प्रभाग विकास निधीची तरतूद केली. म्हणजेच नगरसेवक स्वेच्छाधिकार निधी अंतर्गत प्रत्येक नगरसेवकाला १० लाख ५० हजार तर प्रभाग विकास निधी अंतर्गत प्रत्येक नगरसेवकाला ३० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय प्रलंबीत कामे आणि नगरसेवकांच्या अंदाजपत्रकातील याद्यानुसार कामे हेाणार असल्याने नगरसेवक खुशीत होते. त्यातच सुमारे २२५ कोटी रूपयांची  रस्ता डांबरीकरणाची कामे सुरू झाली असून आणखी दीडशे कोटी रूपयांची रस्त्याची कामे होणार आहेत. मात्र असे असताना मार्च अखेरीस पुन्हा कोरोनाचे संकट वाढलेच, परंतु आरोग्य व्यवस्थेसाठी मेाठ्या प्रमाणात खर्च करावा लागण्याची शक्यता असताना त्यांची कामे कितपत हाेतील याविषयी शंका निर्माण झाली आहे. महापालिकेत यंदा भाजपाची सत्ता आली तसेच बहुतांश नगरसेवक नव्योने निवडून आले असल्याने त्यांना प्रभागांचा कायापालट करण्याचे स्वप्न होते. ही कामे करण्यासाठी पाठपुरावा असतानाच काही कामे मंजुर झाली आणि काहींच्या निविदा मागवण्यात आल्या परंत २०१८ मध्ये तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून रूजु झाले आणि त्यांनी ही सर्व कामे रद्द केली. त्यांच्या मते अनेक कामे अनावश्यक होती परंतु ही कामे ऐनवेळी रद्द केल्याने नगरसेवक नाराज झाले होते. आता विद्यमान आयुक्तांविषयी नगरसेवकांची बऱ्यापैकी सहानुभूती असली तरी त्यांनी गेल्याच महिन्यात आपल्याला विचारल्याशिवाय केाणत्याच कामाची वर्क ऑर्डर देऊ नये असे आदेश काढल्याने नगरसेवक पुन्हा अडचणीत आले आहेत.विशेष म्हणजे एकीकडे नागरी कामांसाठी निधी नाही, त्यावर पर्याय म्हणून कर्जही काढायचे नाही अशी प्रशासनाची एक भूमिका आहे. तर दुसरीकडे केवळ भूसंपादनासाठी तब्बल दीडशे ते दोनशे केाटींचा बार उडविण्यात आला आहे. त्यामुळे नागरी कामांसाठी पैसे नाही ही सबब किती पुरणार?

प्रशासनाला शहर सांभाळायचे असले तरी नगरसेवकांना प्रभागात निवडणूका लढवायच्या असतात. अखेरच्या वर्षी कामे हेाणार नसतील तर निवडणूकींना कसे काय सामोरे जायचे असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाbudget 2021बजेट 2021