शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या धसक्याने शाकाहाराला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:29 IST

कडधान्यांसह पालेभाज्या-फळभाज्यांना मागणी

ठळक मुद्देमांसाहार वर्ज्य केला असल्याने कत्तलखान्यांवर होणारी गर्दी कमी

खमताणे : कोरोनाचा धसका आता महानगरातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातील लोकांनी घेतला असून, कोरोनाचा विषाणू मांसाहारातून येत असल्याच्या अफवांमुळे शाकाहाराला अधिक पसंती दिली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कडधान्यांसह पालेभाज्या-फळभाज्यांनाही मागणी वाढू लागली आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग हा मांसाहारातून होत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचा परिणाम ग्रामीण भागातील पोल्ट्री फार्मसह कत्तलखान्यातील विक्रेत्यांवरही जाणवू लागला आहे. या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय तर पूर्णपणे कोलमडला आहे. कोरोनाच्या धसक्याने लोक आता मांसाहाराऐवजी शाकाहाराला पसंती देत आहेत. त्यामुळे रोजच्या आहारात शाकाहार वाढल्याने भाजीपाला-फळभाज्या यांनाही मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मांसाहार वर्ज्य केला असल्याने कत्तलखान्यांवर होणारी गर्दी कमी होऊ लागली आहे. विक्रेत्यांनी मटन-चिकनचे दर कमी केले असले तरी त्यालाही ग्राहक मिळेनासा झाला आहे. घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी मेन्यूतही मांसाहार जाऊन शाकाहार आला आहे. ग्रामीण भागातील हॉटेल्स, ढाबेसुद्धा ओस पडू लागले आहेत. खवय्ये हॉटेल्स, ढाबे यांच्याकडे पाठ फिरवू लागल्याने हॉटेल व्यवसायही अडचणीत सापडला आहे. या व्यवसायातील रोजगारावरही त्यामुळे गंडांतर आले आहे. सध्या ग्रामीण भागात ओट्यांवर, पारावर, रस्त्यावर, बस स्टॅण्डवर आणि विवाह सोहळ्यांच्या ठिकाणी कोरोनाचीच चर्चा कानी पडत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकvegetableभाज्या