रंगपंचमी उत्सवावर कोरोनाचे सावट, राहाडी उत्सव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 12:03 PM2020-03-13T12:03:02+5:302020-03-13T12:03:13+5:30

नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो पेशवेकालीन रहाडी यानिमित्ताने उघडण्यात येतात आणि त्यात रंगाचा हौद तयार करून त्यात रंग खेळला जातो.

Corona's Rahadi festival close at Rangpanchami festival | रंगपंचमी उत्सवावर कोरोनाचे सावट, राहाडी उत्सव धोक्यात

रंगपंचमी उत्सवावर कोरोनाचे सावट, राहाडी उत्सव धोक्यात

googlenewsNext

नाशिक-  नाशिक शहरात आज खेळल्या जाणाऱ्या रंगपंचमी उत्सवावर कोरोना चे सावट असून, पोलिसांनी पेशवेकालीन रहाडीत उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे. मात्र स्थानिक युवक ऐकण्यास तयार असून सायंकाळी रहाडी मध्येच रंगपंचमी साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो पेशवेकालीन रहाडी यानिमित्ताने उघडण्यात येतात आणि त्यात रंगाचा हौद तयार करून त्यात रंग खेळला जातो. यामुळे सध्या गर्दी करून रहाडीत रंग खेळू नये  असे आवाहन शासन आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे. मात्र त्यानंतरही शहरातील काजीपुरा दिल्ली दरवाजा, सरदार चौक या ठिकाणी राहाडी खोदण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी  रहाडीमध्ये रंग खेळण्यास मनाई केली आहे, मात्र त्यानंतर विविध सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी काल सुभाष मांढरे यांची भेट घेतली त्यांनी देखील राहाडी उत्सव न करण्याचे आवाहन केले आहे मात्र, त्यानंतरही सार्वजनिक मंडळांनी काहीही झाले तरी उत्सव साजरा करण्याचे तयारी केली आहे. दरम्यान, नाशिक शहरात अन्य भागात सकाळ पासूनच रंग खेळण्यास सुरुवात झाली आहे दुपारनंतर उत्सव अधिक जोमाने सुरू होणार आहे.

Web Title: Corona's Rahadi festival close at Rangpanchami festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.