शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

शहरात कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात नवे ७५ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 23:02 IST

शहराचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता एकूण १ हजार ५२ इतका झाला आहे. अद्याप एकूण ५१ रूग्णांचा बळी शहरात गेला आहे.

ठळक मुद्दे४२० रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले ५८१ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत.दाट लोकवस्तीच्या परिसरात कोरोनाचे वाढते थैमान

नाशिक : शहर व परिसरात कोरोना विषाणूचा फैलाव अत्यंत वेगाने होऊ लागला आहे. यामुळे नाशिककरांनी अधिक सतर्क होऊन स्वत:ला गर्दीपासून सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. शुक्रवारी (दि.१९) रात्री दहा वाजेपर्यंत जिल्हा रूग्णालय व महापालिका आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालांनुसार शहरात नवे ७५ कोरोेनाबाधित आढळून आले. तसेच उपचारार्थ दाखल असलेल्या वडाळारोडवरील तीन कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यूही झाला. यामध्ये दोन वृध्द तर एक ३८ वर्षीय तरूण आहे. शहराचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता एकूण १ हजार ५२ इतका झाला आहे. अद्याप एकूण ५१ रूग्णांचा बळी शहरात गेला आहे. ४२० रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत तर ५८१ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत.लॉकडाऊन शिथिल होताच महापालिका हद्दीतील विविध उपनगरीय भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढू लागले. गुरूवारी कोरोनाबाधितांचा आकडा थेट शंभरीपार म्हणजेच ११६ इतका झाला होता. यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनालादेखील धक्का बसला आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असुनही या आजाराचे संक्रमण थांबता थांबत नसल्याने आश्चर्य अन् चिंताही व्यक्त होत आहे. नाशिक महापालिका हद्दीचा कोरोनाग्रस्तांचा आकडा शुक्रवारी एक हजाराच्या पुढे सरकला. गुरूवारी रात्रीपर्यंत शहराचा अतापर्र्यंतचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९७७ इतका होता तर शुक्रवारी थेट १ हजार ५२ झाला. शहरातील दाट लोकवस्तीच्या परिसरात कोरोनाचे वाढते थैमान हा मनपा आरोग्य प्रशासनाचा मोठा चिंतेचा विषय बनत चालला आहे. दाट लोकवस्तीच्या परिसरात कोरोनाचे संक्रमण रोखायचे कसे? हा यक्ष प्रश्न झाला आहे. सातत्याने पंचवटी, जुने नाशिक भागातील दाट लोकवस्तीत रूग्ण आढळून येत आहे. शुक्रवारी तर वडाळागावातसुध्दा पुन्हा दोन रूग्ण मिळून आले. एकूणच दाट वस्तीत कोरोनाचा झालेला शिरकाव हीच मोठी घातक समस्या बनली आहे.परिसरनिहाय आढळून आलेले कोरोनाग्रस्त रूग्ण असेपेठरोडवरील वैशालीनगर-१५, भराडवाडी-१, म्हसरूळ-१, बोरगड-२, एकतानगर (म्हसरूळ)-१, सुखसागर अपार्टमेंट (पेठरोड)-१, हनुमानवाडी-१, मेरी कॉलनी-१, रामवाडी-१, त्रिमुर्ती चौक (दिंडोरीरोड)-१, जुने नाशिक-१ फकिरवाडी-१, दुधबाजार-१, काजीपुरा-२, चौकमंडई-१, नानावली-१, सारडासर्कल-१, गंजमाळ-१, श्रमिकनगर (गंजमाळ)-६, सहकारनगर (गंजमाळ)-२, काठेगल्ली-१, पखालरोड-१, गुलशन कॉलनी-१, भाभानगर-१, विनयनगर-१, इंदिरानगर-२, महेबुबनगर (वडाळा)-१, वडाळागाव-१, माणेकशानगर-१, टाकळीरोड-१, मातोश्रीनगर ( उपनगर)-३, आनंदनगर (उपनगर)-२, जयभवानीरोड-१, स्टेशनवाडी-४, सातपूर भाजीमार्केट-१, संकेत अपार्टमेंट-१, औरंगाबादरोड-१, महाराणाप्रताप चौक (सिडको)-१, त्रिमुर्ती चौक (सिडको)-१, अंबड-१ असे रूग्ण आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात अद्याप १५४ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू