शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर शहरात कोरोनाचा पहिला बळी; प्रशासन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:35 IST

विंचूर : कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या येथील रुग्णाचा नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विंचूर व परिसरात पहिला बळी ठरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. रेल्वे खात्यात सेवेत असल्याने कल्याण येथे वास्तव्यास असलेल्या व येथील रहिवासी असलेल्या ४४वर्षीय इसमाची गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यास मंगळवारी (दि. २३) विंचूर येथे उपचारासाठी आणण्यात आले होते.

विंचूर : कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या येथील रुग्णाचा नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विंचूर व परिसरात पहिला बळी ठरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. रेल्वे खात्यात सेवेत असल्याने कल्याण येथे वास्तव्यास असलेल्या व येथील रहिवासी असलेल्या ४४वर्षीय इसमाची गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यास मंगळवारी (दि. २३) विंचूर येथे उपचारासाठी आणण्यात आले होते.या रुग्णास येथील एका खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले असता या डॉक्टरांनी दुरूनच रु ग्णाची चौकशी केली असता त्यांना रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यास नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्याच्या स्वॅबचे नमुने दि. २४ रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल काल दि. २५ रोजी दुपारी ३ वाजता पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सदर रुग्णाच्या पश्चात आईवडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. यापैकी भाऊवगळता कुटुंबातील इतर सदस्यांना पिंपळगाव येथे क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.खबरदारी म्हणून विंचूर ग्रामपालिकेच्या वतीने रु ग्णाच्या घराजवळील १०० मीटर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करून जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी (दि.२६) विंचूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सदर मृत कोरोना रु ग्ण हा विंचूर येथील रहिवासी होता. परंतु सध्या कल्याण येथे वास्तव्यास होता. त्यामुळे कोरोना बाधा झाल्याच्या कालावधीत या रु ग्णाचा विंचूरमध्ये कोणाशीही जवळून संपर्क आलेला नाही़ फक्त योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे, विंचूर वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. आर. जाधव यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू