शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उपाययोजना सुरू : देवळाली कॅम्पमध्ये कोरोनाचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 21:14 IST

देवळाली कॅम्पमध्ये मास्क न लावता वावरणा-या नागरिकांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्याचे ओदश गोराया यांनी दिले आहेत. तसेच दुकानदारांनाही फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देछावणी परिषद खडबडून झाले जागे

देवळाली कॅम्प : परिसरातील मिठाई स्ट्रीट भागातील एका ६५ वर्षीय वृध्द महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. तसेच शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार पाठविलेल्या ३२ नमुन्यांपैकी १० नमुने हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. छावणी परिषदेकडून तात्काळ बाधित आढळलेल्या परिसरात सॅनिटायझेशनची मोहीम हाती घेण्यात आली.देवळाली कॅम्प परिसरात दोन महिन्यांपुर्वी लष्करातील मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या निवासस्थानी काम करणाºया इसमाला कोरोनाची लागण झाल्यानंतर छावणी परिषद प्रशासन व पोलिसांनी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून संबंधित परिसर सील केला होता. उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर जे.एस.गोराया, उपाध्यक्ष भगवान कटारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी आरोग्य अधिकार्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून कर्मचार्यांना सूचना दिल्या होत्या. लॉकडाऊनचे तंतोतंत पालन होत केले गेल्याने देवळाली कॅम्प भागात कोरोनाचे संक्रमण रोखण्यास छावणी परिषदेला यश आले होते. मात्र चौथे लॉकडाऊन संपताच लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली आणि अनलॉकची घोषणाही झाल्याने पुन्हा देवळाली कॅम्पमध्ये नागरिकांची वर्दळ सुरू झाली.आणि अद्याप आठ करोना बाधित रु ग्ण आढळून आले आहे. लगतच्या भगूर, लहवीत, राहुरी, शेवगेदारणा, नानेगाव येथे ही कोरोनाचा फैलाव सुरू झाला आहे. मिठाई स्ट्रीट येथे राहणार्या ६५ वर्षीय महिला मृत्यूमुखी पडल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. देवळाली कॅम्पमध्ये मास्क न लावता वावरणा-या नागरिकांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्याचे ओदश गोराया यांनी दिले आहेत. तसेच दुकानदारांनाही फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयdevlali-acदेवळालीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू