शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

दुर्दैवी : शहर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी; पाच योध्दे कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:56 IST

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून लढा देत होते; मात्र फुफ्फुसाचा संसर्ग अधिकच वाढल्यामुळे मुंबईतील रूग्णालयात मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्देदोघांवर उपचार सुरूशहरात कोरोनाचा धोका वाढला

नाशिक : आरोग्य प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाच्या संक्रमणकाळात योध्दांच्या भूमिकेत पोलीस दल कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यातील ग्रामिण पोलीस दलानंतर शहर पोलीस दलातसुध्दा काही दिवसांपुर्वी कोरोनाचा शिरकाव झाला. बुधवारी (दि.१) मुंबई येथे रूग्णालयात दाखल असलेल्या एका पोलीस हवालदाराचा कोरोनाने बळी घेतला. पोलीस आयुक्तालयातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला असून संपुर्ण आयुक्तालयावर शोककळा पसरली आहे.नाशिक ग्रामिण पोलीस दलातील तीघा कर्मचाऱ्यांची कोरोनाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली तर शहर पोलीस आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारदेखील मागील पंधरा ते वीस दिवसांपासून लढा देत होते; मात्र फुफ्फुसाचा संसर्ग अधिकच वाढल्यामुळे मुंबईतील रूग्णालयात मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी शहरात येताच इंदिरानगरसह संपुर्ण पोलीस आयुक्तालयावर शोककळा पसरली असून पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. नाशिक शहर पोलीस दलाने त्यांच्या रूपाने एक कोरोना योध्दा गमावल्याची भावना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी व्यक्त केली.शहर पोलीस दलातील एकूण ८ कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. त्यापैकी पाच कोरोनामुक्त झाले तर दोघे अद्याप रूग्णालयांत उपचारार्थ दाखल असून ते परिमंडळ-१मधील पोलीस ठाण्यातील कर्मचारी आहेत. परिमंडळ-२मधील पोलीस ठाण्यातील कर्मचाारी आता कोरोनामुक्त झाले आहेत. मयत झालेल्या पोलीस हवालदारांच्या वारसदारांना शासन नियमानुसार सर्वोतोपरी अर्थसहाय्य केले जाणार आहे. कोरोना संक्रमण काळात कर्तव्य बजावताना पोलीसाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून यापुर्वीच घेण्यात आला आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू