सिन्नरच्या ग्रामीण भागातील कोरोनाची आकडेवारी चिंता वाढविणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST2021-05-12T04:14:54+5:302021-05-12T04:14:54+5:30
------------------ १३ हजार ४४६ जणांची कोरोनावर मात तालुक्यात आतापर्यंत १५ हजार ७३८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील १३ हजार ...

सिन्नरच्या ग्रामीण भागातील कोरोनाची आकडेवारी चिंता वाढविणारी
------------------
१३ हजार ४४६ जणांची कोरोनावर मात
तालुक्यात आतापर्यंत १५ हजार ७३८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील १३ हजार ४४६ जणांनी कोरोनावर मात केली असून, रिकव्हरी दर ८५ टक्के आहे. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत १९२ जणांचा बळी गेला आहे.
-----------------
२१०० रुग्ण ॲक्टिव्ह
सध्या नगरपालिका विभागात २८९, तर ग्रामीण भागातील १८८१, असे २१०० रुग्ण ॲक्टिव आहेत. त्यातील इंडियाबुल्सच्या कोविड सेंटरमध्ये ७८, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात ८५, नाशिक जिल्हा रुग्णालयात ६, खासगी दवाखान्यांमध्ये १०२, तर १८२९ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. बाधित निघाल्यानंतरही स्वतंत्र गृहविलगीकरणाची व्यवस्था नसतानाही अनेक जण कुटुंबातच राहत असल्याने संपूर्ण कुटुंबच बाधित होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातून एकाच कुटुंबातील दोन, तीन सदस्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडूनही नागरिक धडा घेत नसल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.