शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘सायकल सिटी’च्या स्वप्नाला कोरोनाचे बळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 23:10 IST

नाशिक : नाशिक महानगराला सायकल सिटी बनवण्यासाठी नाशिक सायक्लिस्ट असोसिएशनसह विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यरत होते. सर्वस्तरीय प्रयत्नातून नाशिकमध्ये सायकलची चळवळ रुजण्यास मदत झाल्याने नाशिकमध्ये सायकलविक्रीचे प्रमाणदेखील अन्य महानगरांच्या तुलनेत चांगले आहे.

ठळक मुद्दे गिअरच्या सायकल्सना मागणी

अनलॉक : लॉकडाऊन उठल्यापासून सायकल्सच्या विक्रीत दीडपटीने वाढ; आरोग्याबाबत जागृती वाढली

 

धनंजय रिसोडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक महानगराला सायकल सिटी बनवण्यासाठी नाशिक सायक्लिस्ट असोसिएशनसह विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यरत होते. सर्वस्तरीय प्रयत्नातून नाशिकमध्ये सायकलची चळवळ रुजण्यास मदत झाल्याने नाशिकमध्ये सायकलविक्रीचे प्रमाणदेखील अन्य महानगरांच्या तुलनेत चांगले आहे. मात्र, कोरोनाच्या काळात नागरिकांना व्यायाम आणि निरोगी राहण्यासाठी सायकलचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवल्यामुळे जिल्ह्यातील सायकल विक्रीचे प्रमाण गत महिन्यात दीडपट ते दुपटीने वाढले आहे.कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात स्वत:चे आरोग्य जपणे, तंदुरुस्ती वाढविणे यासह प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने घरांमध्ये अडकलेल्या बहुतांश नागरिकांनी कोणत्या ना कोणत्या व्यायामाचा, योगासनांचा किंवा सायकल चालविण्याचा व्यायाम केला. त्यातील बहुतांश सायकल्स या घरातील मुलांसाठी आणलेल्या होत्या. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातच घरोघरच्या कर्त्या व्यक्तींना सायकल्सचे महत्त्व आणि महात्म्य अधिकच प्रकर्षाने जाणवले.निर्बंध शिथिल झाल्यापासून शेकडो घरांमधील कर्त्या नागरिकांनी स्वत:साठी सायकल खरेदीसाठी दुकानांकडे मोर्चा वळवला आहे. यंदाचा गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळातच आल्याने त्या काळात होऊ न शकलेली विक्री लॉकडाऊन उठल्यानंतर होत असल्याने विक्रेत्यांनादेखील काहीसा दिलासा मिळाला आहे.

गिअरच्या सायकल्सना मागणी

नाशिकमध्ये सायकल दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून गिअरच्या सायकलिंगबाबत प्रामुख्याने विचारणा होत आहे. गिअरच्या सायकल्स १५ हजारांपासून उपलब्ध आहेत. तसेच साध्या बिनागिअरच्या सायकल्सनादेखील चांगली मागणी असून, सहा हजारांपासून साध्या सायकल्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

होम एक्सरसाइज सायकल्सची चलती...ज्या नागरिकांना घराबाहेर जाऊन सायकल चालविणे शक्य नसते, अशा नागरिकांकडून होम एक्सरसाइज सायकल्सनादेखील चांगली मागणी आहे. या सायकल्स दहा हजारांपासून पुढे अशा श्रेणीत उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ज्यांच्या घरात पुरेशी मुबलक जागा आहे, अशा नागरिकांकडून या सायकल्सचीच मागणी केली जात आहे. लॉकडाऊन उठल्यापासून साध्या सायकल्सच्या विक्रीत दीडपट तर गिअरच्या सायकल्सच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे. कमी अधिक प्रमाणात बहुतांश सायकल दुकानांमध्ये हीच परिस्थिती आहे. गत अनेक वर्षे सर्व स्तरांवरून सायकल वापराच्या फायद्याचे जे महत्त्व सांगितले जात होते, ते कोरोनाच्या काळात नागरिकांना प्रकर्षाने जाणवल्यानेच ही विक्रीतील वाढ दिसून येत आहे.- किशोर काळे, सायकल व्यावसायिक

टॅग्स :two wheelerटू व्हीलरHealthआरोग्य