महाराष्ट्र दिनानिमित्त कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:23 IST2021-05-05T04:23:00+5:302021-05-05T04:23:00+5:30

नाशिक : अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टर्स असोसिएशनतर्फे नाशिक येथील न्यू आधार हॉस्पिटल व मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दोन ...

Coronary warriors honored on Maharashtra Day | महाराष्ट्र दिनानिमित्त कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

महाराष्ट्र दिनानिमित्त कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

नाशिक : अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टर्स असोसिएशनतर्फे नाशिक येथील न्यू आधार हॉस्पिटल व मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दोन व कामगार दिनाचे औचित्य साधत कोरोना (कोविड-१९) या संकट काळात सेवा देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील व प्रशासकीय क्षेत्रातील पोलीस कर्मचारी यांचा

‘कोरोनायोद्धा - जनसेवा सन्मान’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत डॉ. गौतम खरे यांच्या हस्ते देण्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी आम्रपाली खरे, बाबासाहेब निकम, विकी खरे, रत्ना कारले, जोसेफ नायडू, रोहिणी अहिरे, धनराज निकम उपस्थित होते.

इन्फो -

यांचा झाला सन्मान

डॉ.समीर शेख (एम.डी. मेडिसिन, नाशिक), डॉ. रज्मी फारुकी, डॉ.मतीन खान, डॉ.किशोर करने, पोलीस निरीक्षक विजय ढमाळ (मुंबई नाका पोलीस स्टेशन), वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी (अंबड पोलीस स्टेशन), पोलीस निरीक्षक अहिरे (गुन्हे) एएसआय अविनाश जाधव (वाहतूक शाखा), हवालदार बापू देवरे (मालेगाव), पो.ना. पांडुरंग आहेर, पो.ना. योगीता फसाळे, पो.कॉ.अशोक उगले, सुनील खरात, आनंदा काळे, योगेश ढमाले, इम्रनुद्दिन मुल्ला, ज्योती खैरनार (नर्स), डॉ.दीपक महाले, किशोर पाटील. डॉ.मुस्ताक शेख, अतिक शेख (ऑक्सिजन सप्लायर) ॲम्ब्युलेन्स चालक - संदीप पाटील, सागर आव्हाड आदी.

Web Title: Coronary warriors honored on Maharashtra Day