साठीच्या पुढे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण ५२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:48+5:302021-05-05T04:24:48+5:30

आरोग्य विभागाने केलेल्या मृत्यूच्या विश्लेषणानुसार वाढत्या वयामुळे काेरोनाबाधित रुग्णांची प्रतिकार शक्ती कमी पडत असल्याने, त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ...

The coronary artery mortality rate is 52% | साठीच्या पुढे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण ५२ टक्के

साठीच्या पुढे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण ५२ टक्के

आरोग्य विभागाने केलेल्या मृत्यूच्या विश्लेषणानुसार वाढत्या वयामुळे काेरोनाबाधित रुग्णांची प्रतिकार शक्ती कमी पडत असल्याने, त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यातही वयाची साठी ओलांडलेल्यांना हा धोका अधिक असून, जुने आजार, रक्तदाब, मधुमेह, किडनी, मेंदू विकार असलेल्या रुग्णांवर कोरोनाचा प्रभाव अधिक लवकर होत असल्याने, आजवर मृत्यू झालेल्यांमध्ये कोरोनाबरोबरच अन्य आजार असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्या मानाने शून्य ते बारा वयोगटांतील मुले काेरोनाच्या प्रादुर्भावापासून बचावले आहेत. त्यांच्यातील प्रतिकार शक्ती अधिक असल्यामुळेच आजवर फक्त तीनच बळी कोरोनाने गेल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. किशोरवयीन मुलांचे प्रमाणही त्या मानाने कमी असून, वर्षभरात ३२ जणांचा कोरोनाने बळी घेतला. त्यात १५ मुले व १७ मुलंचा समावेश असून, त्याची टक्केवारी ०.८९ इतकी आहे.

चौकट====

अशी आहे मृत्यूची टक्केवारी

१) ० ते १२- ३ (०.०८)

२) १३ ते २५ - ३२ (०.८९)

३) २६ ते ४०- ३११ (८.६४)

४) ४१ ते ६०- १,३६९ (३८.०३)

५) ६०च्या पुढे- १,८८५ (५२.३६)

Web Title: The coronary artery mortality rate is 52%