कोरोनाकाळ आणि भावनिक व्यवस्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:25+5:302021-07-19T04:11:25+5:30
पालखीसाठी दोन बस त्र्यंबकेश्वरला रवाना नाशिक : श्री क्षेत्र पंढरपूर येथील वारीसाठी त्र्यंबकेश्वर येथून संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांची ...

कोरोनाकाळ आणि भावनिक व्यवस्थापन
पालखीसाठी दोन बस त्र्यंबकेश्वरला रवाना
नाशिक : श्री क्षेत्र पंढरपूर येथील वारीसाठी त्र्यंबकेश्वर येथून संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी निघते. यंदा कोरोनामुळे या पालखी सोहळ्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने दोन शिवशाही बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नाशिक आगाार-१ प्रमुख किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बस रविवारी दुपारी त्र्यंबकेश्वरकडे रवाना करण्यात आल्या. या बसची सर्व तपासणी करण्यात आली, तसेच संपूर्ण बसचे सॅनिटायझेशनदेखील करण्यात आले. दि. १८ ते परतीच्या प्रवासासाठी २४ तारखेपर्यंत या बस संत श्री निवृत्तीनाथ पालखीसाठी उपलब्ध असणार आहेत.
जिल्ह्यातील काेरोना स्थिती नियंत्रणात
नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत कोरोनाचे रुग्ण आणि उपचाराबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत १ हजार ५४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांमध्ये चार ने घट झाली असून ही एक सकारात्मक बाब असल्याने रुग्णसंख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९६.७७ टक्के इतकी आहे तर नाशिक शहरात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. जिल्हा बाह्यरुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ९७.५५ टक्के इतके आहे.
लस घेण्यासाठीही वशिलेबाजीची चर्चा
नाशिक : कोरोना नियंत्रित करण्यासाठी लसीचे कवच महत्त्वाचे असल्याने जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, लसीचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण केंद्रांवर रांग लागत असल्याने अनेकांचा रांगेत उभे राहूनही हिरमोड होत आहे. पहाटेपासून ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य लोक रांगेत उभे राहतात. मात्र, ज्यांचा वशिला आहे अशांना रांगेत उभे न राहता लस मिळत असल्याची चर्चा होत असून या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी समता परिषदेचे तेजस शेरताटे यांनी केली आहे.
180721\18nsk_33_18072021_13.jpg
पालखीसाठी दोन बसेस त्र्यंबकेश्वरला रवाना