कोरोनाने राज्यातील वीस हजार महिला विधवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:24+5:302021-07-24T04:11:24+5:30

चांदवड : महाराष्ट्रात कोरोनाने ५० वर्षे वयाच्या आतील किमान वीस हजार महिला विधवा व निराधार झाल्या आहेत. या महिलांच्या ...

Corona is the widow of twenty thousand women in the state | कोरोनाने राज्यातील वीस हजार महिला विधवा

कोरोनाने राज्यातील वीस हजार महिला विधवा

चांदवड : महाराष्ट्रात कोरोनाने ५० वर्षे वयाच्या आतील किमान वीस हजार महिला विधवा व निराधार झाल्या आहेत. या महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाने राज्यस्तरीय धोरण जाहीर करावे, अशी मागणी विधवा, निराधार महिला पुनर्वसन समितीतर्फ जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहेे.

नाशिक जिल्ह्यातील कोरोनामध्ये विधवा झालेल्या एकल महिला पुनर्वसनाबाबत तातडीने कृती करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना महिला पुनर्वसन समितीचे अंबादास केदारे, नलिनी शार्दूल, दीपाली खेडकर, शिल्पा आग्निहोत्री यांनी दिले. महाराष्ट्रस्तरावर कोरोना कुटुंब पुनर्वसन समिती स्थापन झाली असून, १५० पेक्षा जास्त संस्था त्यात एकत्रित आल्या आहेत. या समन्वयाच्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना शेकडो ई-मेल केले आहेत, ज्यात अशा महिलांच्या पुनर्वसनाची मागणी केली आहे. महिला बालकल्याण विभागाशी राज्यस्तरावर चर्चा सुरू असून, त्यांच्यासोबत कामही करीत असल्याची माहिती केदारे यांनी दिली.

-----------------------------

...या आहेत मागण्या

जिल्ह्याबाहेर झालेले मृत्यू व घरी झालेले मृत्यू, अशा सर्व प्रकारच्या विधवांचा यात समावेश व्हावा. या महिलांची सामाजिक, आर्थिक स्थिती व समस्या लक्षात येण्यासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत या महिलांचे सर्वेक्षण आठ दिवसांच्या आत करावे. त्यामुळे तालुकानिहाय मृत्यू झालेल्यांच्या याद्या नाव, गाव व पत्त्यासह उपलब्ध करून द्याव्यात. या महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुका गटविकास अधिकारी व एकात्मिक बालविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरावर समिती निर्माण करावी, त्यात स्वयंसेवी संस्थांचे पाच प्रतिनिधी असावेत. त्यांनी एकत्रित या महिलांच्या पुनर्वसनासाठी काम करावे. जिल्हाधिकारीस्तरावर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी घेऊन एक समिती स्थापन करून नियमित बैठका घेऊन आढावा घेण्यात यावा. विधवा निराधार पेन्शन योजनेत या सर्व विधवांचा तातडीने समावेश करावा. या महिलांकडे अनेक कागदपत्रे नाहीत. शासकीय योजनांसाठी सर्व कागदपत्रे त्यांना तातडीने दिली जावीत. कागदपत्रांच्या अटी कमी करून तात्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे.

---------------------------------------------------

नाशिक जिल्ह्यातील महिला विधवा व निराधार पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना अंबादास केदारे, नलिनी शार्दूल, दीपाली खेडकर, शिल्पा अग्निहोत्री आदी. (२३ एमएमजी ३)

230721\23nsk_12_23072021_13.jpg

२३ एमएमजी ३

Web Title: Corona is the widow of twenty thousand women in the state