वाडिवऱ्हे येथे कोरोना योदध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 11:11 PM2021-08-14T23:11:28+5:302021-08-14T23:14:40+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील वाडिवऱ्हे येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य फाऊंडेशन व एसएमबीटी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते किरण कातोरे यांच्या संकल्पनेतून विविध आजारांवर निदान करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले होते.

Corona Warriors felicitated at Wadiwarhe | वाडिवऱ्हे येथे कोरोना योदध्यांचा सत्कार

वाडिवऱ्हे येथे आयोजित आरोग्य शिबिरात सत्कार प्रसंगी निवृत्ती जाधव, रामदास धांडे, तुकाराम वारघडे, किरण कातोरे, राजू नाठे व इतर पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देविविध आजारांवर निदान करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील वाडिवऱ्हे येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य फाऊंडेशन व एसएमबीटी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते किरण कातोरे यांच्या संकल्पनेतून विविध आजारांवर निदान करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले होते.

कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, इगतपुरी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील आशा सेविका, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, डॉक्टर आदींनी जनजागृती करत मेहनत घेतल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील वाडिवऱ्हे परिसरातील अविरत सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा स्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने किरण कातोरे यांच्या संकल्पनेतून ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

वेळी आयोजित आरोग्य शिबिरामध्ये प्रामुख्याने हाडांची तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी, ऑक्सिजन तपासणी, मधुमेह तपासणी, दातांची तपासणी, गुडघेदुखी आदीं विविध आजारांवर उपचार करण्यात आले असून उपस्थित तज्ज्ञांमार्फत सल्ला देण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे राजू नाठे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. संदीप गुळवे, तुकाराम वारघडे, मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, किरण कातोरे, डॉ. माळी, डॉ. योगेश मते, डॉ. उल्हास बोडके, सरपंच रोहीदास कातोरे, प्रवीण मालुंजकर, सुदाम भोर, पंडित कातोरे, आरोग्यदूत निवृत्ती गुंड, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 

 

Web Title: Corona Warriors felicitated at Wadiwarhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.