शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

दुर्गोत्सव नव्हे कोरोना योद्धा सन्माननिधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 17:53 IST

नाशिक  : शहरातील बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव काळात गंगापूररोड परिसरातील वृंदावन लॉन्स येथे दुर्गोत्सव आयोजित केला जातो. ...

ठळक मुद्देबंगा संजोग फाउंडेशनचा निर्णयमहोत्सवाची रक्कम कोरोनाशी झुंजणाऱ्यांना

नाशिक : शहरातील बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव काळात गंगापूररोड परिसरातील वृंदावन लॉन्स येथे दुर्गोत्सव आयोजित केला जातो. यंदा करोनामुळे या उत्सवातील कार्यक्र म रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय फाउंडेशनने जाहीर केला आहे. दुर्गोत्सवाला लागणारा खर्च कोरोनाच्या संकटकाळात जे योद्धा म्हणून कार्यरत आहेत आणि ज्यांना मदतीची गरज आहे, अशा कोरोनायोद्धांना सन्माननिधी म्हणून वापरण्यात येणार आहे.बंगाली बांधवांच्या बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने २०१३ पासून विविध उपक्र म राबविले जात आहे. सावरकरनगर येथे दरवर्षी साजऱ्या होणाºया दुर्गोत्सवात विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन केले जाते. त्यात विशेषत: रोज प्रार्थना, आरती, भोग यांसह सांस्कृतिक कार्यक्र म होत असतात. या कार्यक्र मांचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. बंगाली परंपरांचे जतन आणि महाराष्ट्रीयन भाविकांना या परंपरा माहीत होण्यासाठी हा उत्सव उपयुक्त ठरतो. जगावरील संकटकाळात उत्सव साजरा न करण्याचा निर्णय फाउंडेशनने जाहीर केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अरु ण मुखर्जी यांनी दिली. उत्सवातून वाचणाºया खर्चातून कोरोनाशी लढा देणाऱ्यांना मदत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयांचे स्वागत ट्रस्टचे कार्यकारी सदस्य अमिताभ चक्र वर्ती, शंतनू रे, शेखर दत्ता, प्रशांत भट्टाचार्य, सुस्लोव बिस्वास, अनिमेश मुखर्जी आदींनी केले आहे. दरम्यान, फाउंडेशनच्या वतीने कोरोनाकाळात शहर पोलिसांना मास्क, हातमोजे, सॅनिटायझर्स आदींचे वाटप तसेच गरजूंना खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले आहे.गांधीनगरला गत ६६ वर्षांपासून दरवर्षी अविरतपणे दुर्गोत्सव साजरा केला जातो. यंदा आॅक्टोबरमध्ये दुर्गापूजा आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे गरजेचे असल्याने दुर्गोत्सवाची ही परंपरा खंडित होणार आहे. साडेसहा दशकांनंतर ही परंपरा खंडित होत असली तरी पुढील वर्षी पुन्हा पूर्वीच्याच उत्साहाने दुर्गोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या दुर्गोत्सवाचा निधी हा या दुर्गोत्सवावर अवलंबून असणारे मूर्ती कलाकार, मंडप कारागीर, ढाक हे विशेष बंगाली पूजा वाद्य वाजवणारे कलाकार, दुर्गोत्सव पूजा सांगणारे पंडित तसेच अन्य अवलंबितांना दिला जाणार असल्याचे सार्वजनिक दुर्गापूजा उत्सवाचे अध्यक्ष सुजॉय गुप्ता यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकpoojaपूजा