शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ‘हम पाच’ म्हणतच करावे लागणार नववर्षाचे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 15:33 IST

मनमाड - ३१ डिसेंबर २०२१ रोजी सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टीचे बेत आखले जात असतानाच शासनाकडून ...

मनमाड - ३१ डिसेंबर २०२१ रोजी सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टीचे बेत आखले जात असतानाच शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पाच लोकांसमवेतच नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे.

कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव सध्या राज्यात डोकेदुखी ठरत असल्याने त्याला आळा घालण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने काही सुधारित निर्बंध घालून दिले असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कडक सूचना जिल्हा प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार, जिल्हा प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली असून, त्यानुसार रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. शनिवार (दि. २५)पासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात शनिवार, २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४नुसार जमावबंदी आदेश लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर, आस्थापनेवर दंडात्मक कारवाई करण्याच्या कडक सूचना आहेत.

शेत-शिवारात आयोजन

राज्य सरकारने ‘नाईट कर्फ्यू’चा निर्णय घेतल्यामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे जल्लोशी स्वागत कसे करावे, असा प्रश्न तरुणांना पडला आहे. त्यामुळे यंदा मनमाडकरांनी नववर्षाचे स्वागत शेत-शिवारात तसेच गोव्यात जाऊन करण्याचा बेत आखला आहे. ग्रामीण भागातील फार्म हाऊसलाही मागणी वाढली आहे. नववर्ष स्वागताच्या नावाखाली नशेत बेदरकारपणे गाड्या चालविणाऱ्यांना रोखण्यासाठी मनमाड शहर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. थर्टीफर्स्टला शहरात अनुचित प्रकार रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी निरीक्षकांनी दिली.

तारेवरची कसरत होणार

 नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तसेच त्र्यंबकेश्वर ते अंबोली रस्त्यावरील हॉटेल्स ‘थर्टीफर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाईने सजली असली, तरी जमावबंदीच्या आदेशामुळे तरुणाईचा हिरमोड झाला आहे. एकीकडे थर्टीफर्स्टचा आनंद, दुसरीकडे कायद्याचा बडगा तर तिसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तथा ओमायक्राॅनची भीती यामुळे हाॅटेल व्यावसायिक, पार्ट्यांचा आनंद घेणारे नागरिक व पोलीस यंत्रणा यांची तारेवरची कसरत बघायला मिळणार आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या