कोरोना विषाणूचा मेंदूवरही परिणाम : वेखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST2021-05-30T04:13:00+5:302021-05-30T04:13:00+5:30

ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या नाशिक शाखेच्यावतीने डॉ. वेखंडे यांचे नुकतेच ऑनलाइन व्याख्यान झाले, त्यावेळी ते बोलत होते. ज्यांना ...

Corona virus also affects the brain: Vekhande | कोरोना विषाणूचा मेंदूवरही परिणाम : वेखंडे

कोरोना विषाणूचा मेंदूवरही परिणाम : वेखंडे

ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या नाशिक शाखेच्यावतीने डॉ. वेखंडे यांचे नुकतेच ऑनलाइन व्याख्यान झाले, त्यावेळी ते बोलत होते. ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच मूत्रपिंड विकार तसेच कर्करोग आहे, अशांना काेरोना संसर्ग अधिक धोकादायक आहे. त्यामुळेच वेळीच उपचार घेतले पाहिजे, असे वेखंडे यांनी सांगितले. तसेच वेगवेगळ्या मेंदुविकारांची माहिती त्यांनी प्रेझेंटेशनद्वारे दिली. या वेळी उपस्थितांच्या शंकांचे समाधान त्यांनी केले. ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या ग्राहक जागृतीविषयक कार्याची माहिती ध्वनिचित्रफितीद्वारे देण्यात आली. प्रास्ताविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर काटकर यांनी केले तर सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष ॲड. श्रीधर व्यवहारे यांनी केले. सुरेशचंद्र धारणकर यांनी आभार मानले.

या वेळी विभागीय सहसंघटक सुरेंद्र सोनवणे, नागपूर येथील शामकांत पात्रीकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अरुण वाघमारे, मेधाताई कुलकर्णी, प्रज्ञाताई जाेशी, शशिकला धारणकर, उल्हास शिरसाट, प्रकाश जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

छायाचित्र आर फोटोवर २९ संजय वेखंडे नावाने

Web Title: Corona virus also affects the brain: Vekhande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.