शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : 'या' ठिकाणी ९० टक्के लसीकरणासाठी 8 दिवसांचा अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:49 IST

नाशिक - मालेगाव आणि नाशिक महापालिका क्षेत्रात लसीकरण वाढविण्यास पुरेसा वाव असताना ही पहिला आणि दुसरा डोस पुरेसा होऊ शकला ...

नाशिक - मालेगाव आणि नाशिक महापालिका क्षेत्रात लसीकरण वाढविण्यास पुरेसा वाव असताना ही पहिला आणि दुसरा डोस पुरेसा होऊ शकला नसल्याने पुढील आठ दिवसात लसीकरण ९० टक्के करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पुढील तीन दिवसात कुणी सुटी घेतली नाही तर उदिष्टपूर्ती होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.

जागतिक लसीकरण दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा घेतला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, लसीकरण घटना व्यवस्थापक गणेश मिसाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील अहेर, मालेगाव आयुक्त भा.व. गोसावी, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये यांच्यासह आराेग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी महानगरपालिका, नगरपालिका, आराेग्य केंद्रे येथील लसीकरणाचा आढावा घेतला. नगरपालिका क्षेत्रातील पहिला डोस ९० टक्के पेक्षा जास्त व दुसरा डोस ७० टक्के पेक्षा जास्त करण्यासाठी पुढील आठ दिवसात नियोजन करण्यात येऊन कार्यप्रणाली सुरु करण्याबाबत चर्चा केली. ज्या प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये पहिला आणि दुसरा डोस पूर्ण झाला असेल तेथील मनुष्यबळाचा वापर करून ज्या केंद्रांवर लसीकरण अपूर्ण आहे तेथे मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिक व मालेगाव महानगरपालिका यांना लसीकरण वाढविण्यासाठी मोठा वाव असताना मालेगावात अजूनही पुरेसे लसीकरण झालेले नसल्याने या ज्या ठिकाणी केंद्रे वाढविण्याची संधी आहे अशा ठिकाणी लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सत्रे आयाेजित करणे अपेक्षित आहे. पहिला डोस ९० टक्के पेक्षा जास्त होण्यासाठी नियोजन करण्यासाठी आठ दिवसांचा कार्यक्रम आखण्याच्या सूचना गंगाथरन डी यांनी केल्या आहेत.

शाळेतच लसीकरण

१२ ते १४ वयोगटातील लसीकरण सुरू करण्याचे आदेश जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्याप्रमाणे शाळेतच लसीकरणाचे सत्र सुरू करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शिक्षक, पालक समिती बरोबर चर्चा करून शाळांनी लसीकरण सत्रांचे आयोजन करण्याचेही आवाहन त्यांनी केले.

पुढील आठ दिवस महत्त्वाचे

जिल्ह्यातून बाहेर गेलेले लाभार्थी सणासाठी नाशिकमध्ये येतील तेव्हा त्यांचेही लसीकरण करणे सोपे होणार आहे. यासाठी पुढील तीन दिवस महत्त्वाचे आहे. या दिवसात सुटी न घेत लसीकरण कार्यक्रम सुरूच ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस