वडबारी येथे कोरोना लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:14 IST2021-05-01T04:14:36+5:302021-05-01T04:14:36+5:30
यावेळी नागरिकांना कोरोना या संसर्गजन्य आजार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच हौसाबाई ...

वडबारी येथे कोरोना लसीकरण मोहीम
यावेळी नागरिकांना कोरोना या संसर्गजन्य आजार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच हौसाबाई चौधरी, उपसरपंच दामू गवळी, ग्रामपंचायत सदस्य कलावती राऊत, शत्रुघ्न शेवरे, पोलीस पाटील रमेश झिरवाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. योगेश कहांडोळे, पर्यवेक्षक आर. तवर, आरोग्यसेवक राजेंद्र गवळी, आरोग्यसेविका इंदुमती जाधव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुभाष ठाकरे, श्रीमती निकम, आशा स्वयंसेविका अंजना वाघ, प्रभावती बदादे आदी उपस्थित होते.
----------------------------------
जोगमोडी आरोग्य केंद्राची पाहणी
पेठ : पेठ व सुरगाणा तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जोगमोडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी लीना बनसोड यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.