शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत प्रवेशासाठी कोरोना चाचणी दाखला आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:15 IST

सिन्नर: कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून (दि. २४) सुरू होत असून, समितीच्या मुख्य बाजार आवारासह नांदुरशिंगोटे, दोडी ...

सिन्नर: कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून (दि. २४) सुरू होत असून, समितीच्या मुख्य बाजार आवारासह नांदुरशिंगोटे, दोडी बु., पांढुर्ली, नायगाव, वडांगळी व वावी उपबाजार आवारात आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. निगेटिव्ह दाखला व टोकन असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती सभापती लक्ष्मणराव शेळके, सचिव विजय विखे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये बाजार समितीचे कामकाज बंद होते. मात्र, सोमवारपासून बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारासह उपबाजार आवारांतील कामकाज सुरू होत असून, कोरोना विषाणू (कोविड - १९) या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिन्नर मुख्य बाजार आवारात कांदा मालाचे लिलाव दर सोमवार, मंगळावार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार या दिवशी तसेच नांदुरशिंगोटे उपबाजार येथे दर सोमवार व शुक्रवारी, दोडी बु. उपबाजार येथे दर बुधवार, नायगांव उपबाजार येथे दर सोमवार ते शुक्रवार व वडांगळी उपबाजार येथे दर सोमवार ते शुक्रवार याप्रमाणे शेतमालाचे लिलाव होतील. परंतु बाजार आवारात पिकअप ५० व ट्रॅक्टर १०० अशा एकूण १५० वाहनांचेच दिलेल्या टोकनप्रमाणे लिलाव होणार असल्याने कांदा शेतमाल विक्रीस आणताना अगोदरचे दिवशी शेतकर्‍यांनी प्रथम कोरोनाची आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. चाचणी करून घेणे आवश्यक आहे व नंतर टोकन घेऊनच कांदा शेतमाला विक्रीसाठी आणावयाचा आहे.

------------------

शेतकऱ्यांना टोकन

बाजार आवारात येताना केवळ दोन व्यक्तीच (वाहनचालक व शेतकरी) यांनी आर. ए. टी. अथवा आर. टी. पी. सी. आर. कोरोना चाचणी निगेटिव्ह असा शेरा असल्याचा दाखला बाजार आवाराच्या गेटवर दाखविल्यानंतरच प्रवेश दिला जाईल तसेच बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना टोकन नंबर दिले जातील. त्याप्रमाणे संबंधीत शेतकर्‍यांनी दिलेल्या तारखेस टोकनप्रमाणे आपले वाहन बाजार आवारात कांदा माल विक्रीसाठी घेऊन यावे. दिनांकाप्रमाणे नाव नोंदणी केल्याशिवाय व टोकन नंबर सोबत असल्याशिवाय बाजार आवारात प्रवेश दिला जाणार नाही. लिलाव सुरू झाल्यानंतर फक्त माल विक्रेता शेतकरीच वाहनाजवळ थांबेल.

-----------

नियमांचे पालन करावे

बाजार आवारात अनावश्यक गर्दी करू नये व सोशल डिस्टन्सिंग पाळावे. वाहन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याने आपले नाक, तोंड, कान यावर शेतमाल विक्री करून घरी परतत नाही तोपर्यंत मास्क, रुमाल बांधणे आवश्यक राहील. लिलाव झाल्यानंतर क्रमवारीप्रमाणेच गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून आपले वाहन लाईनमध्ये काट्यावर घेऊन जायचे आहे, अशा सूचना संचालक मंडळाने केल्या आहेत.