ग्रामीण भागात कोरोना सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST2021-04-15T04:13:50+5:302021-04-15T04:13:50+5:30

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रसार वाढला असून, त्यामागे धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, दशक्रिया विधीबरोबरच शहरी भागाशी ...

Corona Susat in rural areas | ग्रामीण भागात कोरोना सुसाट

ग्रामीण भागात कोरोना सुसाट

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रसार वाढला असून, त्यामागे धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, दशक्रिया विधीबरोबरच शहरी भागाशी येणारे व्यापारी, व्यावसायिक संबंध कारणीभूत आहेत. विशेष करून नाशिक शहराशी संबंध येणाऱ्या लगतच्या तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, आरोग्य विभागानेदेखील याच भागावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

-----------------

ग्रामसेवक, आरोग्य कर्मचाऱ्यांवर जबाबदारी

१) ग्रामीण भागात गृहविलगीकरणात उपचार घेत असलेल्या संशयित रुग्णांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी गावातील ग्रामसेवक, आरोग्य सेवकांना देण्यात आली आहे.

२) गावोगावी कोराना ग्रामसमित्या गठीत करण्यात आल्या असून, या समित्यांच्या माध्यमातून रुग्णांवर वॉच ठेवला जात आहे.

----------------

एका व्यक्तीमागे पाच व्यक्तींचा शोध

१) कोरोनाग्रस्त एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान पाच ते सहा लोकांची एकाच वेळी तपासणी केली जात आहे.

२) यातील संशयित रुग्णांना काहीशी लक्षणे नसतील तर गृह विलगीकरणात ठेवले जात आहे.

-------

जिल्ह्यातील एकूण रुग्ण- ३५,९३२

ग्रामीण भागातील रुग्ण- १३,३३४

गावामध्ये होमआयसोलेशन असलेले रुग्ण- १००११

--------------------

गृहविलगीकरणात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून, त्यासाठी घरोघरी जाऊन भेटी देणे व त्या माध्यमातून उपचार करणे सुरू आहे.

- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Corona Susat in rural areas