एनपीटीईएलच्या ऑनलाईन अभ्यासक्रम प्रमाणपत्रावर कोरोनाचा शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST2021-07-27T04:15:29+5:302021-07-27T04:15:29+5:30

तंत्रज्ञान वर्धित शिक्षणावरील राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत (एनपीटीईएल) विविध प्रकारचे २३ ऑनलाईन अभ्यासक्रम वेब आणि व्हिडिओच्या माध्यमातून पोर्टलद्वारे उपलब्ध करून ...

Corona stamp on NPTEL's online course certificate | एनपीटीईएलच्या ऑनलाईन अभ्यासक्रम प्रमाणपत्रावर कोरोनाचा शिक्का

एनपीटीईएलच्या ऑनलाईन अभ्यासक्रम प्रमाणपत्रावर कोरोनाचा शिक्का

तंत्रज्ञान वर्धित शिक्षणावरील राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत (एनपीटीईएल) विविध प्रकारचे २३ ऑनलाईन अभ्यासक्रम वेब आणि व्हिडिओच्या माध्यमातून पोर्टलद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही; परंतु अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर परीक्षा शुल्क आकारून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येते. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे एनपीटीईलकडून या परीक्षा दोनदा पुढे ढकललल्यानंतर अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेले परीक्षा शुल्कही एनपीटीईलने परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एनपीटीईलतर्फे कोणतीही पूर्वसूचना न देता संबधित विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र पाठविण्यात आले असून या प्रमाणपत्रावर कोरोना इम्पॅक्ट असा लाल शिक्का लगावण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी उमटत असून संस्थेने परीक्षा रद्द केली असताना अशाप्रकारचा शिक्का प्रमाणपत्रावर लगावणे कितपत योग्य आहे, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

इन्फो-

क्रेडिट पॉइंटसाठी बाटूनेही पुढे ढकलली परीक्षा

एनपीटीईएलतर्फे घेण्यात येणाऱ्या या ऑनलाईन अभ्यासक्रम प्रमाणपत्र परीक्षांच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाकडून या अभ्यासक्रमासाठी ६ गुणांचे क्रेडिट पॉइंट दिले आहे. त्यामुळे एनपीटीईएलची परीक्षा पुढे ढकलल्याने बाटूकडूनही विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकलली होती. मात्र एनपीटीईएलतर्फे एप्रिल २०२१ ची परीक्षा दोनदा पुढे ढकलून अखेर रद्द करून विद्यार्थ्यांना ‘कोविड -१९ इम्पॅक्टेड जानेवारी २०२१ सेमीस्टर’ अशा शिक्का असलेले प्रमाणपत्र पाठविल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

Web Title: Corona stamp on NPTEL's online course certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.