कोरोनाने मूर्तीकारांचा व्यवसाय मंदावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:10 IST2020-08-04T21:27:13+5:302020-08-05T01:10:42+5:30
येवला : कोरोनाने सर्वच स्तरातील उद्योगधंदे बंद पाडले आहेत. अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावरदेखील कोरोनाचे सावट असल्याने मूर्तीकारांचा व्यवसाय मंदावला आहे. अनेक मंडळांनी यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवल्यामुळे गणेशोत्सवाशी संबंधित सर्वच व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

कोरोनाने मूर्तीकारांचा व्यवसाय मंदावला
योगेंद्र वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : कोरोनाने सर्वच स्तरातील उद्योगधंदे बंद पाडले आहेत. अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावरदेखील कोरोनाचे सावट असल्याने मूर्तीकारांचा व्यवसाय मंदावला आहे. अनेक मंडळांनी यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवल्यामुळे गणेशोत्सवाशी संबंधित सर्वच व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
येवला शहरासह तालुक्यात कुंभार समाजासह इतरही अनेक मूर्तीकार गणेशमूर्ती घडवतात. शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी तर गणेशमूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये साधारणत: गणेशोत्सवाच्या चार महिने आधीपासूनच मूर्ती बनविण्याची तयारी सुरू होते. त्यासाठी बाहेरून रंग, वाळू, माती आदी साहित्य आणले जाते.
येवल्यातील गणेशमूर्तींना नाशिक, अहमदनगर, पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद आदी जिल्ह्यांत मोठी मागणी आहे. यंदा मात्र कोरोनामुळे लागू असणाऱ्या लॉकडाऊन व संचारबंदीने गणेशमूर्ती साहित्य उपलब्धतेची मोठी अडचण निर्माण झाली.
याबरोबरच बाहेरील राज्यातून मागणी नाही. परिणामी मूर्तीकारांचे वर्षाचे आर्थिक गणितच बिघडले आहे.नियमांमुळे उत्सवाच्या स्वरूपावरही मर्यादा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा अनेक सार्वजनिक मंडळांनी निर्णय घेतला आहे. यात शासनाच्या अटी-नियमांमुळे गणेशमूर्तीच्या उंचीवर व उत्सवाच्या स्वरूपावरही मर्यादा आल्या आहेत. याबरोबरच यंदा गणेशमूर्तींचे दरही वाढलेले आहेत. गणेशोत्सवाशी संबंधित टी-शर्ट, सजावट साहित्य आदींची विक्री करणाºया व्यावसायिकांवर परिणाम जाणवणार आहे.येवल्यातील गणेशमूर्तींना सुरत, अहमदाबाद, मुंबई, पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद आदी ठिकाणी मोठी मागणी असते. मात्र कोरोनामुळे गणेशमूर्तींना बाहेरील मागणी नाही. लॉकडाऊनमुळे मूर्ती घडवण्यासाठी लागणारे साहित्यही उपलब्ध न झाल्याने यंदा गणेशमूर्तींचे दर वाढलेले आहे.आम्हाला आर्थिक फटका सहन करावा लागतो.
- संजय परदेशी,
मूर्तीकार, येवला