शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
2
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
3
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
4
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
5
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
6
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
7
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
8
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
9
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
11
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
12
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
13
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
14
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
15
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
16
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
17
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
18
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
19
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
20
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

CoronaVirus News : नाशिककरांची चिंता वाढली! पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 14:30 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: पश्चिम आफ्रिकेच्या माली या देशातला नागरिक नाशिकमध्ये एका खासगी कंपनीत आला होता.

नाशिक - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींच्या वर गेला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५७८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २५२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉनने टेन्शन वाढवलं आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान आता नाशिककरांची चिंता वाढली आहे. पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह आलेला नागरिक हा पश्चिम आफ्रिकेचा नागरीक आहे. पश्चिम आफ्रिकेच्या माली या देशातला नागरिक नाशिकमध्ये एका खासगी कंपनीत आला होता. गेल्या तीन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आल्याने त्याची कोरोना चाचणी केली होती तीन नागरिकांपैकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात ४९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्यातील आरोग्य विभागाने दिली आहे. 

राज्यात आतापर्यंत ६४ लाख ९३ हजार ००२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के आहे. राज्यात आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ६ हजार ५०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात ७४ हजार १९० व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर ८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रोन विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. राज्यात दोन ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैकी एक रुग्ण पुणे  आणि एक रुग्ण लातूरमधील आहे. आतापर्यंत २० ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी ९ जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक