कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:18 IST2021-08-14T04:18:05+5:302021-08-14T04:18:05+5:30

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वीरगावपाडे (ता. बागलाण) येथील शासकीय आश्रमशाळेत रक्तदान शिबिराचे उद‌्घाटन मीना यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत ...

Corona preventive vaccine safe | कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित

कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वीरगावपाडे (ता. बागलाण) येथील शासकीय आश्रमशाळेत रक्तदान शिबिराचे उद‌्घाटन मीना यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर देवरे तर पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊसाहेब चौरे, मुख्याध्यापक डी. डी. मोरे आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मीना यांनी यावेळी रक्तदानही केले. आरोग्य अधिकारी डॉ.सविता बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथकाने यावेळी १०९ आदिवासी बांधवांचे लसीकरण केले.

कार्यक्रमास वारकरी संप्रदायाचे विठ्ठल बंगाळ, एच.व्ही. शेवाळे, एस. व्ही. भामरे, एस. आर. इंगळे, व्ही. जे. खलाणे आदींसह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व आदिवासी बांधव उपस्थित होते. ए. यू. खैरनार यांनी प्रास्ताविक, तर डी. एस. सोनार यांनी आभार मानले.

Web Title: Corona preventive vaccine safe