Corona obstructed 6845; Victim 40 | कोरोनाबाधित ६८४५; बळी ४०

कोरोनाबाधित ६८४५; बळी ४०

नाशिक : काेरोना बळींनी सोमवारी (दि. १९) पुन्हा ४० आकडा गाठल्याने आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २९७५ वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा सहा हजारांचा आकडा ओलांडून एकूण ६८४५ पर्यंत मजल मारली आहे.

जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३८७०, तर नाशिक ग्रामीणला २७४८ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १६१ व जिल्हाबाह्य ६६ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात २१, ग्रामीणला १९ असा एकूण ४० जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने तीसहून अधिक राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापेक्षाही कठोर उपाययोजनांच्या अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचा सूर नागरिकांकडूनच व्यक्त होऊ लागला आहे.

इन्फो

उपचारार्थी प्रथमच ४० हजारांवर

जिल्ह्यात ज्या वेगाने कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या प्रथमच ४० हजारांवर जाऊन पोहोचली आहे. एकूण ४१,१५५ वर रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यात २३ हजार ३३२ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १५ हजार ६८१ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, २ हजार ४ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य १३८ रुग्णांचा समावेश आहे.

इन्फो

प्रलंबित अहवालात थोडी घट

गत महिन्यापासून दररोज वाढत असलेल्या नमुन्यांमुळे कोरोना काळात सातत्याने प्रलंबित अहवालांची संख्या मोठी राहत आहे. त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणचे ३२९० असून नाशिक मनपा क्षेत्रातील १८०७, तर मालेगाव मनपाचे ७२६ अहवाल प्रलंबित आहेत. प्रलंबित अहवालांची संख्या मागील आठवड्याच्या पेक्षा काहीशी कमी झाली आहे.

Web Title: Corona obstructed 6845; Victim 40

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.