शहरात कोरोनामुळे नऊ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:19 IST2020-10-03T23:43:13+5:302020-10-04T01:19:04+5:30

नाशिक- शहरात गेल्या चोवीस तासात नऊ जणांचा बळी गेला आहे. ४४७ नवे रूग्ण आढळले आहेत. दरम्यान, रूग्ण संख्या कमी होत असून त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे.

Corona killed nine people in the city | शहरात कोरोनामुळे नऊ जणांचा बळी

शहरात कोरोनामुळे नऊ जणांचा बळी

ठळक मुद्दे चोवीस तासात शहरात ४४७ रूग्ण आढळले

नाशिक- शहरात गेल्या चोवीस तासात नऊ जणांचा बळी गेला आहे. ४४७ नवे रूग्ण आढळले आहेत. दरम्यान, रूग्ण संख्या कमी होत असून त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे.
शहरात जुलै पासून कोरोना बाधीतांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आणि आता तरी पन्नास हजाराच्या वर गेली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रूग्ण संख्या कमी होत आहे. त्याच प्रमाणे मृत्यू पावणा-यांच्या संख्येत प्रमाणात घट झाली आहे. गेल्या चोवीस तासात शहरात ४४७ रूग्ण आढळले आहेत.
यापूर्वी हीच संख्या नऊ शे ते हजाराच्या घरात होती. दरम्यान गेल्या चोवीस तासात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यात जुने नाशिक येथील काजी पुरा येथील ६० रविवार कारंजा येथील ६२ वर्षीय वृध्द, नाशिकरोड येथील ५० वर्षीय रूग्ण, जेलरोड येथील जिजामाता नगर परीसरातील ४८ वर्षीय पुरूष रूग्ण, जुने सिडको येथील पांगरे मळा येथील येथील ७६ वर्षीय रूग्ण, सिडकोतीलच वीर सावरकर नगर येथील ७२ वर्षीय वृध्द,गंगापूरर येथील ६७ वर्षीय रूग्ण, सातपूर येथील अशोक नगर येथील ७५ वर्षीय वृध्द यांचा समावेश आहे.

Web Title: Corona killed nine people in the city