शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोना' संसर्गजन्य आजार; काळजी घेण्याची गरज: डॉ नितीन रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 19:45 IST

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन रावते रावते यांनी दिली. रोग कोणताही असो मात्र त्याबाबत दक्षता घेऊन वेळीच उपचार केले पाहिजेत असेही त्यांनी लोकमतशी संवाद साधताना सांगितले.

ठळक मुद्देनागरिकांनीही या संदर्भात दक्षता घेण्याची गरज आहे.महापालिकेच्या वतीने आता जनप्रबोधनाची मोहीम आजाराचा प्रसार आज जगातील 14 देशांमध्ये झाला आहे

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून जगात कोरोना या नव्या आजाराविषयी चिंता व्यक्त केली जात असली तरी भारतात अद्याप एकही रुग्ण आढळला नाही मात्र यासंदर्भात शासनाने दक्षता घेण्यास प्रारंभ केला आहे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन रावते रावते यांनी दिली. रोग कोणताही असो मात्र त्याबाबत दक्षता घेऊन वेळीच उपचार केले पाहिजेत असेही त्यांनी लोकमतशी संवाद साधताना सांगितले.प्रश्न - सध्या देशभरात चिंतेचा विषय ठरलेल्या कोरोना या रोगाची सद्यस्थिती काय आहेउत्तर- सध्या कोरोना या आजाराची देशभर नव्हे तर जगभरात चर्चा सुरू आहे. या आजाराचा प्रसार आज जगातील 14 देशांमध्ये झाला आहे. भारतामध्ये तशी स्थिती राज्यात निर्माण झालेली नाही मात्र, सरकारच्यावतीने यासंदर्भात काळजी घेतली जात आहे विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. त्यानंतरच त्यांना देशात प्रवेश दिला जात आहे. संशयास्पद रुग्णांना विलगीकरण (स्वतंत्र) कक्षात तपासणीसाठी दाखल करण्यात येते आहे. त्यामुळे भारतात गंभीर परिस्थिती नाही.प्रश्‍न- महाराष्ट्रात या संदर्भात काय काळजी घेतली जात आहे?उत्तर - केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेल्या आदेशानुसार या संसर्गजन्य आजाराबाबत दक्षता घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. राज्यात ठिकाणी वैद्यकीय व्यवसायिकांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये सुद्धा या संदर्भात इंडियन इंडियन मेडिकल असोसिएशन च्या मदतीने कार्यशाळा घेण्यात आली. या रोगाची लक्षणे आढळल्यास त्या रुग्णाचे स्वॅप घेऊन ते तपासणीसाठी मुंबई येथे शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.प्रश्न - या रोगाची लक्षणे काय आहेत आणि त्याचे गांभीर्य काय आहे?उत्तर- साधारणत: स्वाईन फ्ल्यू प्रमाणेच या रोगाची लक्षणे आहेत. सर्दी खोकला आणि अचानक ताप येणे यातून निमोनिया होणे हे या रोगाचे लक्षण आहे. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे नाशिकमध्येच नव्हे तर राज्यस्तरावर अद्याप एकही रुग्ण आढळला नसला तरी प्रशासकीय पातळीवर यासंदर्भात काळजी घेण्यात येत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने नागरिकांनीही या संदर्भात दक्षता घेण्याची गरज आहे.प्रश्न- महापालिका या संदर्भात काय काळजी घेत आहे.उत्तर- शासनाच्या आदेशाप्रमाणे आरोग्य उपसंचालकांनी बैठक घेऊन शासकीय यंत्रणांना कार्यवाही करण्यास सांगितले आहे त्यामुळे नाशिक महापालिकेच्या वतीने आता जनप्रबोधनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी दक्षता घेऊन योग्यवेळी वैद्यकिय सल्ला घेतल्यास अडचण होणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोनाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य