कोरोनाने हिरावला उन्हाळी शिबिराचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:22+5:302021-05-10T04:14:22+5:30

संगमेश्वर : उन्हाळी शिबिरे, छंद वर्ग, क्रीडा प्रशिक्षण, पर्यटन, भटकंती, बाल वाचनालय या सर्वांवर कोरोनामुळे सलग दुसऱ्यांदा मर्यादा आल्याने ...

Corona Hiravala enjoyed summer camp | कोरोनाने हिरावला उन्हाळी शिबिराचा आनंद

कोरोनाने हिरावला उन्हाळी शिबिराचा आनंद

संगमेश्वर : उन्हाळी शिबिरे, छंद वर्ग, क्रीडा प्रशिक्षण, पर्यटन, भटकंती, बाल वाचनालय या सर्वांवर कोरोनामुळे सलग दुसऱ्यांदा मर्यादा आल्याने शालेय विद्यार्थ्यांचा आनंद हिरावला गेला आहे.

साधारणपणे १५ एप्रिल ते १५ जून हा दोन महिन्यांचा कालावधी शालेय उन्हाळी सुट्ट्यांचा असतो. वर्षभराचा अभ्यास, परीक्षा यातून मुले मोकळी होतात. अभ्यासाशिवाय इतर अनेक गोष्टी शिकण्यासाठी हा काळ उपलब्ध असतो. विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून विद्यार्थी मनावर चांगले संस्कार होण्यासाठी व्यक्तिमत्व शिबिर, चित्रकला, हस्तकला आदींचे छंदवर्ग, पोहणे, विविध खेळांचे प्रशिक्षण आदींचे आयोजन करुन मुलांची उन्हाळी सुट्टी सत्कारणी लावली जाते. शहरातील सार्वजनिक वाचनालय विविध विषयांवरील पुस्तके मुलांना मोफत वाचनासाठी उपलब्ध करून देतात. मात्र, गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे संकट आल्याने या सर्वांवर बंदी आली आहे. शालेय विद्यार्थी चांगल्या गोष्टींना मुकले आहेत.

मामाचे गाव नाही की, निसर्ग पर्यटन, ना किल्ल्यांंची भ्रमंती. हे सर्व थांबल्याने लहान मुले कोमेजून गेली आहेत. घरी राहून ती मोबाईल, टी. व्ही. याद्वारे आनंद घेत आहेत. मालेगाव परिसरात राष्ट्र सेवा दल, कलारंजक संस्था, योग विद्याधाम यासारख्या संस्थांचा मुलांसाठी शिबिरे घेण्यात पुढाकार असतो. या शिबिरांना चांगला प्रतिसादही मिळतो. मात्र, कोरोना सावटाने मुलांचा आनंद हिरावून घेतला आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, अशी प्रार्थना मुले व त्यांचे पालक करत आहेत.

कोट...

भावी वाचनपिढी घडविण्यासाठी दरवर्षी मुलांना विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली जातात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे मर्यादा आल्याने मुले पुस्तकांना मुकली आहेत, याची आम्हाला खंत वाटते.

- अशोक पठाडे, सचिव, साधना वाचनालय, संगमेश्वर, मालेगाव.

Web Title: Corona Hiravala enjoyed summer camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.