कोरोनामुळे आधार नोंदणीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:14 IST2021-05-14T04:14:20+5:302021-05-14T04:14:20+5:30

रस्ते बंद तरीही वर्दळ सुरूच नाशिक : जेल रोड येथील इंदिरा गांधी पुतळा-लोखंडे मळा मार्ग बॅरिकेडस् टाकून बंद करण्यात ...

Corona hinders Aadhaar registration | कोरोनामुळे आधार नोंदणीला अडथळा

कोरोनामुळे आधार नोंदणीला अडथळा

रस्ते बंद तरीही वर्दळ सुरूच

नाशिक : जेल रोड येथील इंदिरा गांधी पुतळा-लोखंडे मळा मार्ग बॅरिकेडस् टाकून बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक थांबली असली तरी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरूच आहे. वाहतूक रोखण्याचा मूळ उद्देश यामुळे सफल झालेला नसून नागरिकांची वर्दळ सुरूच असल्याचे दिसते.

रस्त्यावर थुंकणाऱ्यांना शिस्त लावावी

नाशिक : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असताना रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्धदेखील कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. रस्त्यावर थुंकल्यामुळेदेखील कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असताना अशा बेशिस्त नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

देवळालीतील आठवडे बाजार सुरूच

नाशिक : कोराेनाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील आठवडे बाजार पूर्णपणे बंद करण्यात आलेले असताना देवळाली गावातील सोमवारचा आठवडे बाजार मात्र काही प्रमाणात भरत आहे. बाजारात कोरोना प्रतिबंध नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, विक्रेत्यांचे मास्क हनुवटीवरच असतात. अशा विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईची आवश्यकता आहे.

Web Title: Corona hinders Aadhaar registration