शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे धुळवडीचा रंग पडला फिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 01:01 IST

होळी किंवा धुळवड म्हणजे सर्वांसाठीच  आनंदाचा आणि रंगांचा उत्सव, परंतु, यावर्षी कोरोनाच्या फैलावामुळे होळीचा रंग फिका पडल्याचे दिसून आले.  शहरात दरवर्षी सातपूर व अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील  अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, चुंचाळे, अंबड लिंक रोड, सिडको भागात उत्तर भारतीय कुटुंबीयांकडून एकत्र येत  एकमेकांना शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात होळी अर्थात धुळवड सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे नागरिकांनी  एकत्र न येता घरातच कुटुंबीयांसमवेत रंग खेळत गोड पदार्थ तयार करून होळीचा (धुळवडीचा) सण साजरा केला.

ठळक मुद्देआरोग्य नियमांचे पालन  : उत्तर भारतीयांचा कुटुंबांसाेबत होळी सण

नाशिक : होळी किंवा धुळवड म्हणजे सर्वांसाठीच  आनंदाचा आणि रंगांचा उत्सव, परंतु, यावर्षी कोरोनाच्या फैलावामुळे होळीचा रंग फिका पडल्याचे दिसून आले.  शहरात दरवर्षी सातपूर व अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील  अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, चुंचाळे, अंबड लिंक रोड, सिडको भागात उत्तर भारतीय कुटुंबीयांकडून एकत्र येत  एकमेकांना शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात होळी अर्थात धुळवड सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे नागरिकांनी  एकत्र न येता घरातच कुटुंबीयांसमवेत रंग खेळत गोड पदार्थ तयार करून होळीचा (धुळवडीचा) सण साजरा केला.देवळालीत सर्वधर्मीयांचे धूलिवंदनधूलिवंदन सण देवळाली कॅम्प परिसरात कोरड्या रंगाची उधळण करत साजरा करण्यात आला. यावेळी उत्तर भारतीयांसह जैन, सिंधी बांधवांसह सर्व धर्मीयांनी एकमेकांना कोरडा रंग लावत पाण्यात भिजण्याचा आनंद लुटला. नागरिकांनी कुठेही एकत्र न येता एकमेकांना रंगाने माखवताना पर्यावरणपूरक रंगाचा वापर करीत कोरडी धुळवड साजरी करत  आनंद लुटला. जैन बांधवांच्या विविध आरोग्य धाममध्ये पर्यावरणपूरक रंगाची उधळण करत तरुणाई व बच्चे कंपनीने पाण्याचे फुगे उडवत एकमेकांना रंगाने भिजवले. जुन्या बसस्थानक येथे नागरिकांसह येथील लष्करी भागात परंपरेप्रमाणे होळी खेळण्यात आली. 

मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात साधेपणा जाणवत होता. कुठेही नियमाचा भंग होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली. दरवर्षी धुळवडीच्या दिवशी सर्व जाती, धर्माचे लोक एकत्र येऊन संपूर्ण शहरात रंगाची उधळण करतात. यंदा मात्र हा प्रकार कुठेही दिसला नाही. देवळाली कॅम्प पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीत याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन नागरिक करताना दिसत होते. (फोटो डेस्कॅनवर)

टॅग्स :NashikनाशिकHoliहोळी