लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : यंदाच्या गुरुपौर्णिमेवर कोरोनाचे सावट आहे. दरवर्षाप्रमाणे येथे होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. परंपरा मोडीत निघू नये म्हणून काही आश्रमांमध्ये घरगुती कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.परिसरातील अनेक मठ आश्रमांमध्ये अनेक साधु-महंतांचे वास्तव्य आहे. हे सर्व साधुमहंत- ऋषीमुनींप्रमाणे आपले जीवन व्यतीत करतात. अशा गुरुंचा शिष्य परिवारदेखील मोठा आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी होणाऱ्या गुरुपौर्णिमेला देशाच्या विविध भागातून हजारो शिष्यगण आपल्या गुरुंचे प्रवचन, मार्गदर्शन ऐकण्यासाठी येथे येत असतात. मात्र कोरोना महामारीमुळे वाढविण्यात आलेले लॉकडाऊन व शहरात असलेले प्रतिबंधित क्षेत्र यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त होणाºया गर्दीवर निश्चित परिणाम होईल, अशी माहिती श्री स्वामी सागरानंद सरस्वती आश्रमाचे प्रमुख श्रीमहंत स्वामी शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा यांनी दिली.त्र्यंबकेश्वर परिसरात श्री स्वामी समर्थ गुरु पीठ, महंत श्रीगुरु बिंदुजी महाराज, पेगलवाडी फाटा स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, श्रीमहंत सहजानंदगिरीजी तथा राजू महाराज तळवाडे, श्रीमहंत राजेशपुरी, पेगलवाडी, माधव महाराज घुले, इगतपुरी, त्र्यंबक आदींसह शिरसगाव आदी परिसरात अनेक आश्रम आहेत.
गुरुपौर्णिमेवर कोरोनाचा प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:13 IST
त्र्यंबकेश्वर : यंदाच्या गुरुपौर्णिमेवर कोरोनाचे सावट आहे. दरवर्षाप्रमाणे येथे होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. परंपरा मोडीत निघू नये म्हणून काही आश्रमांमध्ये घरगुती कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुपौर्णिमेवर कोरोनाचा प्रभाव
ठळक मुद्देकाही आश्रमांमध्ये घरगुती कार्यक्र मांचे आयोजन