कोरोनाने पुन्हा ओलांडला साडेपाचशेचा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 11:22 PM2021-03-04T23:22:04+5:302021-03-05T00:48:50+5:30

नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने बुधवारी तब्बल साडेपाचशेचा टप्पा ओलांडून ५५८ बाधित संख्येपर्यंत वाढ नोंदवली आहे. तर दिवसभरात ३३० नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत.

Corona again crossed the five-and-a-half mark | कोरोनाने पुन्हा ओलांडला साडेपाचशेचा आकडा

कोरोनाने पुन्हा ओलांडला साडेपाचशेचा आकडा

Next
ठळक मुद्देआतापर्यंतच्या मृतांची संख्या २१२२ वर

नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने बुधवारी तब्बल साडेपाचशेचा टप्पा ओलांडून ५५८ बाधित संख्येपर्यंत वाढ नोंदवली आहे. तर दिवसभरात ३३० नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, नाशिक ग्रामीणला चार तर नाशिक शहरात एक असा एकूण ५ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या मृतांची संख्या २१२२ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख २४ हजार३०७ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १८ हजार ७६४ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

जिल्ह्यात ३४२१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.५४ वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९५.६५, नाशिक ग्रामीण ९६.९२, मालेगाव शहरात ९१.६६, तर जिल्हाबाह्य ९३.६८ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ५२ हजार २५असून, त्यातील चार लाख २५ हजार ४३७ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख २४ हजार ३०७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर २२८१ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: Corona again crossed the five-and-a-half mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.