बनावट कागदपत्रांद्वारे सहकारी बँकेची कोटीची फसवणूक
By Admin | Updated: April 12, 2017 22:14 IST2017-04-12T22:14:52+5:302017-04-12T22:14:52+5:30
बनावट गहाणखताद्वारे गिरणा सहकारी बँकेची एक कोटी रुपयांची फसवणूक

बनावट कागदपत्रांद्वारे सहकारी बँकेची कोटीची फसवणूक
नाशिक : बनावट गहाणखताद्वारे गिरणा सहकारी बँकेची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बँकेचे व्यवस्थापक नितीन रघुनाथ निकुंभ (४१, रुपाली अपार्टमेंट, फ्लॅट नंबर १४, दादाजी कोंडदेव नगर, गंगापूर रोड, नाशिक) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार २४ सप्टेंबर २०१० ते २ फेब्रुवारी २०११ या कालावधीत मायक्रो व्हिजन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संशयित अतुल नेमीचंद धाडीवाल (सूरज एन्क्लेव्हज, एबीबी सर्कल, महात्मानगर), प्रती अतुल धाडीवाल, आनंदकुमार रामचंद्र चोरडिया यांनी संगमनेर येथील मिळकतीचे बँकेच्या नावे बनावट गहाणखत तयार करून त्यावर सह्या केल्या़ यानंतर या गहाणखतावर दुय्यम निबंधक संगमनेर यांच्या कार्यालयाचे बनावट शिक्के करून ते बँकेत दाखल केले व ५० लाखांचे दोन असे एक कोटी रुपये कर्ज घेतले़ यानंतर हे कर्ज थकवून बँकेची फसवणूक केली़