नाशिक-निफाडसाठी आज सहकारमंत्र्यांना घालणार साकडे
By Admin | Updated: January 19, 2016 23:40 IST2016-01-19T23:18:51+5:302016-01-19T23:40:50+5:30
नाशिक-निफाडसाठी आज सहकारमंत्र्यांना घालणार साकडे

नाशिक-निफाडसाठी आज सहकारमंत्र्यांना घालणार साकडे
नाशिक : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पार्श्वभूमीवर निफाड व नाशिक सहकारी साखर कारखान्यालाही राज्य शिखर बॅँकेने कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी उद्या (दि.२०) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे शिष्टमंडळ सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे.
सोमवारीच (दि.१८) विठेवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गाळपाचा शुभारंभ झाला. त्या कार्यक्रमात जिल्हा बॅँकेचे अर्धा डझनहून अधिक संचालक उपस्थित होते. याच कार्यक्रमात खासदार व जिल्हा बॅँकेचे संचालक हरिश्चंद्र चव्हाण यांनी वसाकाप्रमाणेच निसाकालाही कर्ज देण्याची मागणी केली. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मागणी करून काही मिनिटे होत नाही. तोच जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे व संचालक माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निसाका व नासाका सुरू करण्यासाठी शासनाने थकहमी द्यावी. जेणेकरून या परिसरातील ऊस उत्पादकांची मोठी अडचण दूर होईल, असे सांगितले. यासंदर्भात आता जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे व संचालक माजी आमदार माणिकराव कोकाटे उद्या बुधवारी (दि.२०) सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईला भेट घेणार असून, त्यांना निसाका व नासाका सुरू करण्यासाठी शासनाने थकहमी द्यावी, यासाठी साकडे घालणार आहेत. (प्रतिनिधी)
मालेगावी पाणी पुरवठ्याची मागणी
मालेगाव : येथील महानगर पालिकेच्या हद्दीतील प्रभाग १ मध्ये एकता नगर, गवळीवाडा, कैलास नगर आदी भागात नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भारिप महासंघाचे बिपिन पटाईत यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या भागात मनपातर्फे नियमित पाणी पुरवठा करण्यात येत नाही. केला जाणारा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने केला जात असल्याने नागरिकांचे हाल होतात. (प्रतिनिधी)