शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
3
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
4
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
5
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
6
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
7
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
8
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
9
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
10
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
11
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
12
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
13
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
14
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
15
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
16
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
17
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
18
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
19
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
20
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

मनपाचे सभागृह होणार थंडा थंडा कूल कूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 1:08 AM

महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील सभागृहात गेल्याच महिन्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नगरसेवक संतप्त झाले होते. आधीच असह्य उकाडा त्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नगरसेवकांच्या संतापाचा बांध फुटला असला तरी आता मात्र हे सभागृह थंडा थंडा कूल कूल राहील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात सभागृहातील वातावरण गरम होणार नाही, असाही अंदाज प्रशासकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देशीतवायू : सभागृहातील कामकाज आता ‘तापणार’ नाही!

नाशिक : महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील सभागृहात गेल्याच महिन्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नगरसेवक संतप्त झाले होते. आधीच असह्य उकाडा त्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नगरसेवकांच्या संतापाचा बांध फुटला असला तरी आता मात्र हे सभागृह थंडा थंडा कूल कूल राहील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात सभागृहातील वातावरण गरम होणार नाही, असाही अंदाज प्रशासकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत.गेल्यावर्षी सभागृहात एअर कुलिंग बसविण्याचे काम मंजूर होते, परंतु ते रखडले होते मात्र आता महापालिकेने तातडीने हे काम सुरू केले आहे.विधिमंडळाच्या धर्तीवर महापालिकेने १९९४ साली ही इमारत बांधली आहे. त्यातील सभागृहदेखील आगळ्यावेगळ्या पद्धतीचे असल्याने त्यावेळी सभागृहात वातानुकूलित यंत्रे नव्हती. आता मात्र त्याची गरज भासू लागली आहे. सभागृहात पंखे असले तरी त्यातील अनेक पंखे बंद होते. महापौरांच्या पीठासनावर महापौर, उपमहापौर आणि आयुक्त विराजमान असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी त्याठिकाणी एअर कुलरची सोय केली जाते, परंतु अन्य नगरसेवकांची मात्र गैरसोय होत असते. त्यातच गेल्या महिन्यात महासभेच्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सुरुवातीला अर्धा तास आणि नंतर एक तास सभागृहातील कामकाज स्थगित करावे लागले. त्याचवेळी असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र, अधिकारी सुधारले आणि आता सभागृह तातडीने कुल कूल करण्याची तयारी सुरू केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौर