नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सोमवारी (दि. ७) नियोजित एकविसावा दीक्षान्त सोहळा स्थगित करण्यात आला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी दिली. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा सोमवारी कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने होणार होता. मात्र, राष्ट्रीय दुखवट्यामुळे हा पूर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 01:38 IST