सातबारा उताºयासह विविध सेवा-सुविधा मिळणार सुलभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:09 IST2017-08-06T23:47:40+5:302017-08-07T00:09:24+5:30
चांदवड तालुक्यात सातबारा उताºयासह अन्य सर्व कामकाम लवकरच आधुनिक संगणकावर करण्यात येणार असल्याने कामात सुलभता येणार असल्याची माहिती देण्यात आली.

सातबारा उताºयासह विविध सेवा-सुविधा मिळणार सुलभ
चांदवड : चांदवड तालुक्यात सातबारा उताºयासह अन्य सर्व कामकाम लवकरच आधुनिक संगणकावर करण्यात येणार असल्याने कामात सुलभता येणार असल्याची माहिती देण्यात आली.
संगणकीकृत करण्याचे काम ९९.२८ टक्के झाले असून, गावनमुना व सातबारा उतारा व इतर सेवा सुलभ रितीने मिळाव्यात यासाठी तालुका व मंडळ मुख्यालयात किआॅस्क मशीनचा शुभारंभ येत्या १५ आॅगस्टपासून होणार असल्याची माहिती चांदवडचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली. लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत आॅनलाईन सेवेत जून २०१७ मध्ये नाशिक जिल्ह्यात एकूण १ लाख २९ हजार ९९० इतक्या सेवा आॅनलाइन पध्दतीने डिजिटल सही वापरुन उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे.