शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राफेल पुजनानंतरचा वाद अर्धवट ज्ञानावर आधारीत; कॅप्टन अजित ओढेकर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 19:30 IST

नाशिक- फ्रान्समध्ये गेल्यानंतर राफेल लढावू विमान ताब्यात घेण्यापूर्वी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विमानाचे केलेले पूजन आणि लिंबू नारळ ठेवल्याने त्यावरून वांदग सुरू झाला आहे. अनेकांनी त्याची निर्भत्सना करीत असून राजनाथसिंह हे अंधश्रध्देला खतपाणी घालत असल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅप्टन अजित ओढेकर यांनी अशाप्रकारची टीका अनाठायी असल्याचे मत व्यक्त केले. सदरचा वाद अर्धवट ज्ञानावर आधारीत असल्याचे देखील ते म्हणाले.

ठळक मुद्देसैन्याच्या मनोबलासाठीच कृतीलष्कराच्या प्रत्येक युनीटमध्ये होते पुजा अर्चा

नाशिक- फ्रान्समध्ये गेल्यानंतर राफेल लढावू विमान ताब्यात घेण्यापूर्वी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विमानाचे केलेले पूजन आणि लिंबू नारळ ठेवल्याने त्यावरून वांदग सुरू झाला आहे. अनेकांनी त्याची निर्भत्सना करीत असून राजनाथसिंह हे अंधश्रध्देला खतपाणी घालत असल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅप्टन अजित ओढेकर यांनी अशाप्रकारची टीका अनाठायी असल्याचे मत व्यक्त केले. सदरचा वाद अर्धवट ज्ञानावर आधारीत असल्याचे देखील ते म्हणाले.प्रश्न: संरक्षण मंत्र्यांच्या राफेलच्या पुजन तसेच लिंबु नारळाचा त्यासाठी वापर करण्यामुळे वाद उदभवला आहे त्याविषयी काय सांगाल?ओढेकर: राजनाथ सिंग यांनी राफेलय विमान शस्त्राचे पुजन करून शत्रूवर विजय मिळवण्याच्या कामात अदृष्य शक्तींना, देवतांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्यातून चुकीचा अर्थ काढले जात आहेत. अशाप्रकारच्या पुजनातून सैनिकांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न असतो. त्याला कोणतेही चुकीचे संदर्भ जोडता कामा नये. नविन विमानच नव्हे तर नविन रणगाडा किंवा अन्य काही साहित्य लष्करात दाखल होते तेव्हा देखील त्याचे पुजन होते.प्रश्न: लष्करासारख्या विषयात जेथे थेट आमने सामने लढाई होते, तेथे अशाप्रकारचे विमान पुजनाचे कर्मकांड कितपत उपयुक्त?ओढेकर: अनेकांना याबाबत मुळातच माहिती नाही. लष्कराच्या अनेक युनीटमध्ये ब्रिटीशकाळापासून अशाप्रकारच्या सर्वधर्मियांच्या श्रध्दा जोपासण्याचे आणि त्या माध्यमातून मनोबल वाढविण्याचे काम केले जाते. त्याविषयी गैर काहीच नाही. लष्कराच्या युनीटमध्ये दर रविवारी मंदिर परेड देखील असते. हे मंदिर म्हणजे सर्व धर्म स्थल असते. येथे देखील रामकृष्ण, तसेच ग्रंथसाहेब, ग्रंथसाहेब, कुराण, बायबल एकत्र असतात. त्यामुळे ते केवळ हिंदुंचेच असते असे नाही सर्व धर्मियांचे असते युनीटची कामगिरी चांगली व्हावी, फत्ते व्हावी यासाठी मंदिर परेड असते. त्यामुळे अशाप्रकारे लढावू विमानाची पुजा अर्चा करणे गैर काहीच नाही.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकDefenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंह