नाशिक : वाहतूक कोंडी व अपघाताचे कारण दाखवून पोलीस आयुक्तांनी गत आठ महिन्यांपासून बंद केलेला मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगरचा बोगदा पंधरवड्यासाठी का होईना, मंगळवारी (दि.८) रात्री दहा वाजता खुला करण्यात आला. मोर्चे, आंदोलने व नागरिकांची निवेदने, राजकीय पक्षांचा पाठपुरावा यामुळे बोगदा खुला करण्याबाबत प्रशासनावर दबाव वाढला होता. दरम्यान, पंधरा दिवसांच्या वाहतुकीचा आढावा घेऊन याबाबत नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण पोलीस प्रशासनाने दिले आहे.१२ जुलै २०१५ सालापासून इंदिरानगर बोगदा शहर पोलीस वाहतूक शाखेने वाढते अपघात व वाहतुकीची होणारी कोंडी रोखण्यासाठी बंद केला होता. यासाठी जनतेच्या सूचना व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या तंत्रज्ञांच्या समितीच्या अहवालानुसार शहर वाहतूक शाखेने बोगदा बंद करण्याचा निर्णय घेत सुरक्षित वाहतुकीसाठी हा अनोखा पर्याय शोधला होता.
वादग्रस्त बोगदा अखेर खुला
By admin | Updated: March 9, 2016 00:19 IST