Controlling inflation of essential commodities | जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ नियंत्रणात ठेवावी

पेठचे तहसीलदार संदिप भोसले यांना निवेदन देतांना गणेश गवळी, अरूणा वारडे.

ठळक मुद्देमागणी : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दळणवळणाची व्यवस्था ठप्प झाल्याने ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा दाखवून व्यापाऱ्यांकडून चढ्या भावाने मालाची विक्र ी होण्यावर प्रशासनाने लक्ष देऊन भाववाढ नियंत्रणात ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेठ हा आदिवासी व दुर्गम तालुका असल्याने खाजगी व्यापारी वर्गाकडून जीवनावश्यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून ग्राहकांना चढ्या भावाने विक्र ी होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. शासनाकडून सर्व जिवनावश्यक सेवा सुरू असतांना चढ्या भावाने मालाची विक्र ी म्हणजे ग्राहकांची फसवणक असून याबाबत व्यापारी महासंघाची बैठक घेऊन सुचना देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर राज्य युवा कार्याध्यक्ष गणेश गवळी, अरूणा वारडे आदींच्या सहया आहेत.

 

 

 

 

Web Title: Controlling inflation of essential commodities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.