..तर ठेकेदाराला टाकणार ‘काळ्या’ यादीत

By Admin | Updated: June 20, 2014 01:18 IST2014-06-20T00:45:13+5:302014-06-20T01:18:49+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या झेरॉक्स मशीन खरेदीबाबत वाद

..but the contractor will put 'black' on the list | ..तर ठेकेदाराला टाकणार ‘काळ्या’ यादीत

..तर ठेकेदाराला टाकणार ‘काळ्या’ यादीत

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या झेरॉक्स मशीन खरेदीबाबत वाद निर्माण होताच आता सभापती राजेश नवाळे यांनी झेरॉक्स मशीन जर निकृष्ट दर्ज्याची असतील तर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात येईल, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली.
विशेष म्हणजे झेरॉक्स मशीन खरेदी ही शासन दर करारानुसारच करण्यात आली आहे, मात्र झेरॉक्स मशीनबाबत जर तक्रारी असतील तर निश्चितपणे या तक्रारींची चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यास संबंधित झेरॉक्स मशीन पुरवठादारास काळ्या यादीत टाकण्यात येईल, तसेच त्याची जमा असलेली १० टक्के अनामत रकमेतून लाभार्थींना लाभ दिला जाईल, असे राजेश नवाळे यांनी स्पष्ट केले होेते. समाज कल्याण समितीच्याच सदस्याने यासंदर्भात उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्याकडे झेरॉक्स मशीन खरेदीबाबत तक्रार केली होती.
बाजारभावानुसार जास्त दराने तसेच निकृष्ट दर्ज्याच्या मशीनची खरेदी केल्याची तक्रार केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजेश नवाळे यांनी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांची भेट घेतली. तसेच तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित पुरवठादारास काळ्या यादीत टाकण्याचे स्पष्ट केले.(प्रतिनिधी)

Web Title: ..but the contractor will put 'black' on the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.