श्रीलंकेच्या कृषी मंत्रालयाबरोबर नाशिकच्या एम अ‍ॅण्ड एम इंडस्ट्रिजचा करार

By Admin | Updated: September 10, 2016 00:57 IST2016-09-10T00:56:30+5:302016-09-10T00:57:21+5:30

श्रीलंकेच्या कृषी मंत्रालयाबरोबर नाशिकच्या एम अ‍ॅण्ड एम इंडस्ट्रिजचा करार

Contract of M & M Industries of Nashik with Sri Lankan Ministry of Agriculture | श्रीलंकेच्या कृषी मंत्रालयाबरोबर नाशिकच्या एम अ‍ॅण्ड एम इंडस्ट्रिजचा करार

श्रीलंकेच्या कृषी मंत्रालयाबरोबर नाशिकच्या एम अ‍ॅण्ड एम इंडस्ट्रिजचा करार

नाशिक : दिंडोरी, तळेगाव येथील एम अ‍ॅण्ड एम इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या सेंद्रीय शेती उत्पादनांद्वारे श्रीलंका येथे १९९९ सालापासून सेंद्रीय शेती क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने तसेच श्रीलंकेतील सेंद्रीय शेतीला नवी चालना मिळावी यासाठी श्रीलंका सरकारच्या कृषी मंत्रालयाबरोबर सेंद्रीय शेती विकास प्रशिक्षण आणि सेंद्रीय उत्पादने वितरणाचा महत्त्वपूर्ण करार शुक्रवारी (दि. ९) करण्यात आला.
त्र्यंबकरोड येथील हॉटेल एमराल्ड पार्क येथे हा करार करण्यासाठी श्रीलंका येथील अन्न विकास मंडळाचे अध्यक्ष प्रभात पेईरिस आणि संचालक गोवीगाडा प्रियांकरा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. एम अ‍ॅण्ड एम या कंपनीतर्फे श्रीलंकेसह जगभरातील १६ देशांना सेंद्रीय उत्पादनाची निर्यात करण्यात येते. केवळ निर्यात न करता त्या-त्या देशातील शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्त्व विशद करणे, त्याचा वापर, विक्री व्यवस्था, नियोजन याबाबतही मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या करारानंतर श्रीलंका सरकार तेथील शेतकऱ्यांना अल्प दरात सेंद्रीय शेती उत्पादने कृषी सहाय्य केंद्रातून उपलब्ध करून देणार आहे.
एम अ‍ॅण्ड एम कंपनीची उत्पादने जागतिक सेंद्रीय प्रमाणकानुसार दिंडोरी येथील कारखान्यात तयार होतात. श्रीलंका सरकारने भारतीय सेंद्रीय शेतीची चळवळ लक्षात
घेऊन तसेच भारतीय उत्पादनावर विश्वास ठेवून नाशिकमधील कंपनीला संधी मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. श्रीलंका कृषी मंत्रालयाबरोबरचा हा करार म्हणजेच सेंद्रीय शेती विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या करारामुळे प्रशिक्षण आणि सेंदी्रय शेतीला आवश्यक अशा उत्पादनामुळे श्रीलंकेत सेंद्रीय चळवळ वाढण्यास मदत होणार आहे.
यावेळी एम अ‍ॅण्ड एम कंपनीचे संचालक मनोहर शेटे यांनी श्रीलंकेचे अन्न विकास मंडळ आणि श्रीलंकेचे कृषिमंत्री डूमिंडा दिशानायके यांचे आभार मानले. यावेळी श्रीलंका कृषी मंत्रालयाचे प्रतिनिधी अन्न विकास महामंडळाचे अध्यक्ष दमिका पेरिस, उपाध्यक्ष रवि जयवर्षना, एम अ‍ॅण्ड एम इंडस्ट्रिजचे संचालक मनोहर शेटे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Contract of M & M Industries of Nashik with Sri Lankan Ministry of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.