शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

ठेका पाच वर्षांसाठी

By admin | Updated: January 21, 2016 23:20 IST

शिक्कामोर्तब : घंटागाडीसंबंधी प्रशासनाकडून निविदाप्रक्रिया सुरू

नाशिक : तीन, पाच की दहा वर्षे या घोळात अडकलेला घंटागाडीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, महापालिका प्रशासनाने शहरातील सहाही विभागातील कचरा संकलनासाठी पाच वर्षे कालावधीचा ठेका देण्याकरिता निविदाप्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे येत्या दीड ते दोन महिन्यांत नाशिकच्या रस्त्यांवर नवीन घंटागाड्या पाहायला मिळतील. दरम्यान, विद्यमान ठेकेदारांना महापालिकेने काळ्या यादीत टाकल्याने त्यांना सदर निविदाप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. घंटागाडीच्या ठेक्यासंबंधीचा करारनामा जून २०१५ मध्येच संपुष्टात आला असून, त्यानंतर संबंधित ठेकेदारांना प्रशासनाकडून वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. दरम्यान, घंटागाडीचा ठेका सुमारे तीनशे कोटी रुपयांचा दहा वर्षे कालावधीसाठी देण्याचा प्रस्ताव आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महासभेवर ठेवला होता. सदर प्रस्तावानुसार ठेकेदारांना नवीन घंटागाड्यांची खरेदी अनिवार्य करण्यात आली होती. ‘वाहनाचे जितके आयुष्य तितके ठेक्याचे आयुष्य’ हा फार्म्युला आयुक्तांनी महासभेवर मांडला; परंतु महासभेने तो एकमताने फेटाळून लावत सुरुवातीला तीन वर्षे कालावधीसाठीच ठेका देण्याला संमती दर्शविली. परंतु, प्रशासनाने महासभेच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब लावला. प्रशासनाने पुन्हा एकदा महासभेवर दहा वर्षांसाठी फेरप्रस्ताव ठेवला. त्यावेळी महासभेत गोंधळ होऊन महापौरांनी प्रस्तावाला मंजुरी दिली; परंतु नंतर सत्ताधारी मनसेवर टीका होऊ लागल्यावर महापौरांनी सभागृहाबाहेर निर्णय फिरवत ठेका पाच वर्षांसाठी देण्याचे घोषित केले. संबंधित ठेकेदारांनी चांगले काम केल्यास त्यांना पुढे दोन वर्षे वाढवून देण्याबाबत त्यावेळची महासभा निर्णय घेईल, असेही महापौरांनी ठरावात नमूद केले. महापौरांच्या या निर्णयाविरुद्ध भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी शासनाकडे तक्रार केली असता शासनाने निर्णयाची कार्यवाहीची प्रक्रिया थांबविली होती. परंतु, वरिष्ठ स्तरावर चर्चा होऊन शासनाने घंटागाडीच्या निविदाप्रक्रियेतील अडसर दूर केला. त्यानुसार, प्रशासनाने घंटागाडीचा पाच वर्षांसाठी ठेका देण्याकरिता गुरुवारी ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला निविदाप्रक्रियेचा घोळ एकदाचा मिटला आहे. महापालिका पहिल्यांदाच पाच वर्षांसाठी घंटागाडीचा ठेका देत असून त्याला ठेकेदारांकडून कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे आता लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे लक्ष लागून राहणार आहे. (प्रतिनिधी)