वीजनिर्मितीत सातत्य; महानिर्मितीचा दावा
By Admin | Updated: July 23, 2014 00:28 IST2014-07-23T00:21:23+5:302014-07-23T00:28:41+5:30
वीजनिर्मितीत सातत्य; महानिर्मितीचा दावा

वीजनिर्मितीत सातत्य; महानिर्मितीचा दावा
नाशिक : महानिर्मितीला गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भेडसावणारी कोळशाची टंचाई पुन्हा एकदा निर्माण झाली होती. त्यातच कमी पर्जन्यमानामुळे परळी औष्णिक केंद्रातील निर्मितीवरही परिणाम झाला होता. शिवाय मान्सूनला विलंब झाल्यानेही निर्मितीवर परिणाम झाला असतानाही महानिर्मिती कंपनीने वीज निर्मितीत सातत्य राखल्याचा दावा केला आहे. १ एप्रिल ते ८ जुलै या कालावधीत महानिर्मितीने आपल्या सर्व औष्णिक विद्युत केंद्रांमधून ११,८८० दशलक्ष युनिट इतकी वीजनिर्मिती साध्य केल्याचा दावा केला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत महानिर्मितीने ९७७१ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती केली होती. यावर्षी कठीण काळातूनही कंपनीने २१०९ दशलक्ष युनिट्स इतकी वाढीव वीजनिर्मिती केली असल्याचे महानिर्मितीने पत्रकात म्हटले आहे.