आशययुक्त पत्रकारिताच टिकणार : कुबेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:42 IST2021-01-08T04:42:52+5:302021-01-08T04:42:52+5:30

एका माध्यमामुळे दुसरे माध्यम संपत नाही. रेडिओ, टीव्हीनंतरदेखील वृत्तपत्रे टिकून आहेत. पत्रकार म्हणून आपल्याला काहीतरी साांगायचे असते ती संकल्पना ...

Content will only survive: Kuber | आशययुक्त पत्रकारिताच टिकणार : कुबेर

आशययुक्त पत्रकारिताच टिकणार : कुबेर

एका माध्यमामुळे दुसरे माध्यम संपत नाही. रेडिओ, टीव्हीनंतरदेखील वृत्तपत्रे टिकून आहेत. पत्रकार म्हणून आपल्याला काहीतरी साांगायचे असते ती संकल्पना बदलणार नाही. चांगली पत्रकारिता म्हणजेच चांगला आशय देणे असे सांगून कुबेर यांनी सामाजिक माध्यमांमुळे लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळाली. लोकांच्या हातात माध्यमे आल्याने खऱ्या अर्थाने लोकशाहीकरणास प्रारंभ झाला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. येणारी नवी माध्यमे कशी वापरायची याबाबत शिकवले जात नसल्याने अनेक समस्या निर्माण होतात. पत्रकारितेत दोष नसतो तर पत्रकारात दोष असू शकतो, असे मान्य करून त्यांनी पत्रकारितेपेक्षा पत्रकार कधीही मोठा नाही असेही स्पष्ट केले. पत्रकारितेत येणाऱ्यांचे वाचन कमी झाले आहे, त्यामुळे विद्वता कमी पडत चालल्याची खंतही कुबेर यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: Content will only survive: Kuber