वणी परिसरात दूषित पाणीपुरवठा

By Admin | Updated: August 21, 2014 00:20 IST2014-08-19T23:12:58+5:302014-08-21T00:20:00+5:30

आरोग्याची समस्या : विषाणूजन्य रुग्णांची संख्या चिंताजनक

Contaminated water supply in Wani area | वणी परिसरात दूषित पाणीपुरवठा

वणी परिसरात दूषित पाणीपुरवठा

वणी : दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे साथीचे आजार बळावले असून, हिवताप, अतिसार, कावीळ, विषमज्वर व विषाणूजन्य रुग्णसंख्येची एप्रिल ते जुलै महिन्याची आकडेवारी चिंताजनक आहे.
एप्रिल ते जुलै २०१४ या चार महिन्यांत हिवताप-४, अतिसार-१४३, कावीळ-८, विषमज्वर-७१, विषाणूजन्य आजार -१५५ ही रुग्णांची अधिकृत आकडेवारी वणी ग्रामीण रुग्णालयातील असून, याव्यतिरिक्त अनेक खासगी रुग्णालयांत अशाच आजाराचे रुग्ण उपचार घेत असल्याचे बोलले जात आहे.
हे सर्व आजार दूषित पाणी व परिसर अस्वच्छतेमुळे होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्षात एका वैद्यकीय अधिकाऱ्यालाही डेंग्यू झाला होता.
पंचवीस हजार लोकवस्ती असलेल्या वणी शहराच्या पाणीपुरवठा योजनेची स्थिती अशी ओझरखेड धरणालगतच्या विहिरीतून सुमारे सहा किलोमीटर अंतरातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टर हाऊसमध्ये पाणी सोडण्यात येते. एका तासात २० हजार लिटर पाणी शुद्ध करण्यात येते. जलशुद्धी केंद्रातून हे पाणी पंपहाऊसमध्ये येते. या पंपहाऊसची क्षमता ७० हजार लिटर इतकी आहे. येथून दोन लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभात पाणी जमा होते ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते.
तद्नंतर पिंपळगाव रस्त्यावरील दोन लाख लिटर, टोकाडीपाडा येथील एक लाख ५० हजार लिटर, बोरीचा पाडा येथील ५० हजार लिटर, शिलपाडा ५० हजार लिटर व इतर जलकुंभाद्वारे वणी शहरात पाणीपुरवठा करण्यात येतो.
स्वच्छ व शुद्ध पाण्यासाठी टीसीएल, तुरटी आदिंचा वापर करण्यात येतो तसेच जलशुद्धीकरण केंद्रात राजस्थान येथून आणलेली रेती साठविण्यात येते. १५ टन इतकी क्षमता या केंद्राची आहे. पाणीशुद्धी करणासाठी अडीच वर्षांनी ही रेती बदलणे आवश्यक आहे. आत असणाऱ्या रेतीला अडीच वर्षाचा कालावधी झाला आहे. ग्रामपालिकेने दुसरी रेती मागविली आहे. मात्र मनुष्यबळाअभावी हे काम लांबणीवर पडले आहे. दरम्यान, डासांची उत्पत्तीस्थाने दूषित पाणीपुरवठ्याची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिल्याचे पांडाणे अधिकारी डॉ. आहिरे यांनी सांगितले.

Web Title: Contaminated water supply in Wani area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.