शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणीपुरवठ्याने आरोग्य धोक्यात 

By suyog.joshi | Updated: June 6, 2024 16:57 IST

 जुन्या नाशकात मागील काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाला याबाबत ...

 जुन्या नाशकात मागील काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाला याबाबत कल्पना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दूषित पाणीपुरवठा थांबला नाही, तर मनपावर मोर्चा काढत जाब विचारला जाईल, असा इशारा काँग्रेस सेवादल शहराध्यक्ष डाॅ. वसंत ठाकूर यांनी दिला आहे. जुन्या नाशिकमधील पाटील गल्ली, बुधवार पेठ, संभाजी चौक, गजराज चौक, कुंभारवाडा, काझी गडी, नानावली, फकीरवाडी, कथडा, छपरीची तालीम, नाईकवाडी, चव्हाटा, पेठ म्हसरूळ टेक, तांबट लाइन या भागामध्ये सतत दूषित मातीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे.

आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना त्यातही दूषित गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. वरील भागात अनेक ठिकाणी लहान मुलं व वयोवृद्ध नागरिक आजारी पडले आहेत. लहान मुलांमध्ये काॅलरा, डायरिया याची साथ पाहायला मिळत आहे. दूषित पाणीपुरवठा त्वरित थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सेवा दलामार्फत देण्यात आला.स्मार्ट सिटीच्या नावाखाली जागोजागी खोदकाम करून पाण्याच्या पाइपलाइन फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची गळती सुरू आहे. दुसरीकडे कमी दाबाने पाणी नागरिकांना द्यायचे आणि तेही दूषित पाणीपुरवठा. हे थांबले पाहिजे.-- डॉ. वसंत ठाकूर, शहराध्यक्ष, काँग्रेस सेवा दल 

टॅग्स :Nashikनाशिक